अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मिळूनही तुरुंगवास कायम

 मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दलच्या वादग्रस्त पोस्टनंतर अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) अडचणीत सापडली आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावरील इतर गुन्ह्यांचा तपासही सुरु आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या अपडेटनुसार केतकीला अॅट्रोसिटी काद्यान्वे जामीन मंजूर करण्यात आला आहे.

25 हजार रुपयांच्या दंडानंतर तिला जामीन मंजूर झाला असला तरी तुरुंगातून मात्र तिची सुटका अद्याप झालेली नाही. कारण एका दुसऱ्या केसची सुनावणी केतकीविरुद्ध सुरु असून ही सुनावणी 21 जून रोजी होणार असल्याने ती अद्यापही जेलमध्येच राहणार आहे.

दरम्यान, मागच्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर केतकी चितळे ( Ketaki Chitale Case ) हे नाव चांगलच चर्चेत आलं आहे. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणं तिला चांगल महागात पडलं होतं. केतकीच्या त्या पोस्टनंतर राज्यभर तिच्याविरोधात आंदोलनं झाली होती. तिच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे.  आता केतकी चितळेनं आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याविरोधात पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.