लग्न मंडपातच ‘या’ अभिनेत्याने पत्नीचे घेतले चुंबन; सोशल मीडियावर तो व्हिडिओ झाला वायरल

दिल्ली : ‘बाहुबली’ फेम अभिनेता राणा डग्गुबतीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राणा (राणा दग्गुबती) पत्नी मिहिका बजाजसोबत लग्नाच्या मंडपात बसला आहे. दोघांच्या लग्नाचा हा व्हिडिओ खूपच रोमँटिक आहे. दोघेही अतिशय सुंदर पोशाख परिधान केलेले दिसत आहेत आणि त्यामध्ये ते दोघेही खुश दिसत आहे.

त्यावेळी दोघांनी लग्न मंडपात बसून लिपलॉक केले. पण हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण काहीतरी वेगळंच आहे. या सुंदर व्हिडिओमध्ये एक क्षण असाही आहे जेव्हा राणा डग्गुबती त्याची पत्नी मिहिका बजाजला किस करताना दिसत आहे. दोघांना मंडपात लिपलॉक करताना पाहणे खूपच मनोरंजक आहे. राणाचे चाहते हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड शेअर करत आहेत.

बाहुबली चित्रपटात त्यांनी भल्लालदेवाची भूमिका साकारली होती. राणा दग्गुबतीने चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती आणि चित्रपटात हा अभिनेता प्रभासशी स्पर्धा करताना दाखवण्यात आला होता. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की त्याचा दुसरा भागही बनवण्यात आला, जो सर्वांना अधिक आवडला.