भाजपा व आरएसएस यांचा अजेंडाच मुळात आरक्षण संपवण्याचा आहे : नाना पटोले

nana

मुंबई –ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकले पाहिजे यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली होती. या बैठकीतच आरक्षण टिकावे यावर चर्चा होऊन ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण ठेऊन निवडणुका घ्याव्यात व त्याबाबतचा अध्यादेश काढण्याचा निर्णय झाला. या अध्यादेशाला आगामी अधिवेशनात कायद्याचे स्वरुप द्यावे असा निर्णय झाला. सुप्रीम कोर्टाने अध्यादेशाला स्थगिती दिली आहे, यावरील पुढील सुनावणी १३ तारखेला होत असून त्यावेळी राज्य सरकार आपली भूमिका मांडेल आणि त्यातून निश्चित मार्ग निघेल असे आम्हाला वाटते.

ओबीसींच्या आरक्षणाचा गुंता तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळेच वाढला आहे. भाजपाची याबद्दलची दुट्टपी भूमिका आहे. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समान नागरी कायद्यासाठी आग्रही आहे तर दुसरीकडे भाजपा ओबीसींच्या आरक्षणासाठी लढत आहे असे दाखवून लोकांची दिशाभूल करत आहे. भाजपा व आरएसएस यांचा अजेंडाच मुळात आरक्षण संपवण्याचा आहे. आरएसएसची आरक्षणाबद्दलची भूमिका आधी भाजपाने स्पष्ट करावी व मग आंदोलनाबदद्ल त्यांनी बोलावे. त्यांचा छुपा अजेंडा सर्वांना माहित आहे, त्यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे. भाजपा बहुजनांची दिशाभूल करत आहे. काँग्रेस सुरुवातीपासूनच आरक्षणाच्या बाजूने आहे आणि ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत हीच काँग्रेसची भुमिका आहे, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Previous Post
गोपीकिशन बाजोरियांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे : नाना पटोले

गोपीकिशन बाजोरियांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे : नाना पटोले

Next Post
अंकिता पाटील

हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून

Related Posts
Turmeric farming

नोकरी नाही मिळाली, मग सुरू केली सेंद्रिय शेती, आता लाखात कमावतोय ‘हा’ तरुण

असं म्हणतात की एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर लोक पुढे जाण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि मेहनत…
Read More
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीत एक हजार कोटी घेतले; शिवसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप

हिंगोली – आमदार संतोष बांगर हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य  करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता त्यांनी वंचितचे…
Read More
सुवर्णपदक विजेत्या कुस्तीगीराचा वेदनादायक मृत्यू, २७० किलो वजन मानेवर पडले

सुवर्णपदक विजेत्या कुस्तीगीराचा वेदनादायक मृत्यू, २७० किलो वजन मानेवर पडले

Female Powerlifter Yashtika Acharya Dies | बिकानेरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महिला वेटलिफ्टर यष्टिका आचार्यचा वेटलिफ्टिंग…
Read More