14 फेब्रुवारी ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करा, भावनिक समृद्धी मिळवा, जाणून घ्या कोणी केले हे आवाहन 

Cow Hug Day : पशु कल्याण मंडळाने व्हॅलेंटाईन डे ऐवजी 14 फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ साजरा करण्याची मागणी केली आहे.(The Animal Welfare Board has demanded that ‘Cow Hug Day’ be celebrated on February 14 instead of Valentine’s Day). 14 फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावे आणि व्हॅलेंटाईन डे ऐवजी ‘काऊ हग डे’ साजरा करावा, अशी मंडळाने मागणी केली आहे.

“सर्व गाईप्रेमींनी 14 फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण बनवून गायींना मिठी मारून हा दिवस साजरा करावा,” असे पशु कल्याण मंडळाच्या पत्रकात  म्हटलं आहे.