राज्यभर हर्बल तंबाखूची चर्चा सुरू असताना ‘या’ शहरात राबविले जाते आहे तंबाखू विरोधी अभियान

लातूर :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या वतीने लातूर शहरात तंबाखू विरोधी अभियान राबविण्यात आले.

यात COTPA 2003 कायद्यानुसार सर्व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती व धुम्रपान प्रतिबंधित क्षेत्र चे फलक लावण्यात आले. राज्य शासन आरोग्य विभाग मार्फत दिलेल्या सूचना नुसार व जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी तंबाखू विरोधी फलक लावणे व उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कार्यवाही करण्याची कार्यवाही जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येत आहे.

जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष हरिदास, यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबविला जात आहे. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था मार्फत शहरात असणारे प्रमूख सरकारी कार्यालय तसेच खाजगी कार्यालय, संस्था येथे कोटपा 2003 कलम 4 अन्वये धुम्रपान निषिद्ध क्षेत्र फलक लावण्यात आले, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री केंद्र वर कलम 6 ब नुसार फलक लावण्यात आले तसेच शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्री करू नये असे फलक लावण्यात आले.

या अभियानास जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी, अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी शुभेच्छा, देवून सहकार्य केले.

या अभियानास यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकिस्तक कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव शिंदे, तंबाखू नियंत्रण कक्षा चे डॉ. उटिकर माधुरी, प्रकाश बेंबरे , कु संध्या शेडोळे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांचे अभिजीत संघाई व घाटगे यांनी कार्य केले.

https://www.youtube.com/watch?v=G4H1kdtPdh0

Previous Post

सुधारित, हरित फटाकेच नागरिकांनी वापरावेत; पोलिस आयुक्तांचे आवाहन

Next Post

दिपावली सण उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Related Posts

खोट बोल पण रेटून बोल हेच भाजपचे ब्रीद वाक्य – यशोमती ठाकूर

बुलढाणा : अच्छे दिनच्या बात मारणाऱ्या सरकारने महागाईने कळस गाठलाय, खोट बोल पण रेटून बोल हेच ब्रीद असलेल्या…
Read More
क्रिती सेननने कबीर बहियासोबतच्या नात्याची पुष्टी केली? रूमर्ड कपलने एकत्र साजरी केली दिवाळी

क्रिती सेननने कबीर बहियासोबतच्या नात्याची पुष्टी केली? रूमर्ड कपलने एकत्र साजरी केली दिवाळी

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेननने (Kriti Sanon) आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा सण घरीच साजरा केला. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर तिच्या…
Read More
car

भारतात 2021 मध्ये ‘या’ कारला गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले

नवी दिल्ली : 2021 मध्ये ऑटो उद्योगाला सेमीकंडक्टरच्या कमतरतेचा फटका बसला आहे. त्यामुळे त्याच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. तथापि,…
Read More