Rajabhau Phad | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यातील परळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठे नेते राजेश (राजाभाऊ) फड ( Rajabhau Phad) यांचा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राज्यसभा खासदार फौजिया खान आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे, सरचिटणीस अदितीताई नलावडे, सरचिटणीस रवींद्र पवार, यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो, त्यावर जो कोणी आवाज उठवतो, त्याचा आवाज दाबला जातो. राजकारण हे समाजकारणाला स्थान देणारं पाहिजे, येथील चित्र बदलतय, लोकसभा निवडणुकीआधी सुद्धा ते दिसलं. देशाचे पंतप्रधान सांगत होते आम्ही 400 पार निवडून येणार, पण त्यांचे किती खासदार आले. राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या, त्यापैकी 8 जागा आपण जिंकून आणल्या, असे शरद पवार म्हणाले.
आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजप सोबत सत्तेत जाऊन बसले, लोकांची फसवणूक या लोकांनी केली आणि सत्तेमध्ये सहभागी झाले, ज्यांनी आमच्या नावावर निवडणुका जिंकून सरकार स्थापन केले त्यांनी आम्हाला सोडून दिले आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, परळीमध्ये मोठी सभा आपण घेऊ आणि दाखवून देऊ. राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
‘…तर ब्रिजभूषण सिंह यांचाही एन्काऊंटर व्हायला हवा होता’, विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
महायुती 100 चा आकडा पार करणार नाही; राष्ट्रवादीच्या महेश तपासेंची टीका
सुषमा अंधारेंची मागणी प्रशांत जगतापांनी फेटाळली; ‘मविआ’त जागवाटपावरून संघर्ष