भाजपा केडरनं मला पक्षात स्वीकारलेलंच नाही, विजयानंतर मोन्सेरात भाजपवरच भडकले

पणजी : देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, 3 राज्यांमध्ये भाजपने आघाडी कायम ठेवली आहे. गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजप सध्या १७ जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात सर्वात जास्त चर्चेत असणारी जागा म्हणजे पणजी विधानसभा मतरदार संघाची होती. याठिकाणी भाजपने दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांनी तिकीट नाकारले होते.

उत्पल पर्रीकर यांनी तिकीट नाकारल्यानंतर बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र पंजीकर जनतेने पर्रीकर यांना नाकारलेल दिसत आहे. कारण पणजी मधून भाजपचे बाबूश मोन्सेरात यांचा विजय झाला आहे. पर्रीकर यांच्या ८०० मतांनी पराभव झाला असून हा पर्रीकर याना मोठा धक्का मनाला जात आहे. या पराभवानंतर उत्पल पर्रीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी माझ्या लढतीवर समाधानी आहे, पण निकालामुळे थोडा निराश आहे’ असं पर्रीकर म्हणाले आहेत.

तर, या विजयावर बाबूश मोन्सेरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला वाटतं की भाजपा केडरनं मला पक्षात स्वीकारलेलंच नाही. मी याकडे त्या दृष्टीने पाहातो. जर उत्पल पर्रीकरांना इतकी मतं मिळत असतील, तर ती फक्त भाजपा केडरनं आपली मतं त्यांच्याकडे वळवल्यामुळेच मिळाली. मी फक्त हेच बघू शकतो. भाजपा पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला डॅमेज कंट्रोल करण्यात अपयश आलं’ असं मोन्सेरात म्हणाले आहेत.