लव जिहादच्या विषारी विळख्यातून एक अल्पवयीन तरुणी वाचवली म्हणून भाजप नेत्याने मानले पोलिसांचे आभार

अमरावती – अल्पवयीन मुलीला जाळ्यात अडकवण्यासाठी त्या मुलीचा पिच्छा पुरवणाऱ्या व तिला नाहक त्रास देणाऱ्या सय्यद इम्रान अली मुमताज अली या आरोपीचा शोध घेऊन त्यास पोक्सो अंतर्गत अटक केल्याने एक लव जिहाद (Love Jihad) प्रकरणाचा अंत झाला म्हणून आज भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांचे आभार मानले आहे. याच प्रकरणी पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध देखील केला आहे.

सय्यद इम्रान अली मुमताज अली हा तरुण अकरावीत शिकणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मागे लागला होता. तिचा सतत पिच्छा करणे, तिला रस्त्यात अडवणे, तिच्या इच्छेविरुद्ध आपल्यासोबत चलण्यासाठी आग्रह करणे, असा त्रास तिला देत होता. ही मुलगी या मुलाला ओळखत पण नव्हती. तिच्या कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी कसोशीने तपास करून सय्यद इम्रानला ताब्यात घेतले. एक अल्पवयीन मुलगी लव जिहादची शिकार बनत असताना पोलिसांना मदत करण्या ऐवजी पोलिसांवर सशस्त्र हल्ला केला गेला. यात पोलीस उपनिरीक्षक पंकज ढोके गंभीर जखमी झाले.

पोलिसांवर हल्ला करणे अतिशय निंदनीय आहे. काही महाभाग हल्लेखोरांना वाचवण्यासाठी लव जिहादचे मूळ प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहेत. एका अल्पवयीन मुलीला न्याय देण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या पोलिसांवर हल्ला करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिंताजनक आहे.

आज शिवराय कुळकर्णी यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात जाऊन लव जिहादच्या विषारी विळख्यातून एक अल्पवयीन तरुणी वाचवली म्हणून गाडगे नगर पोलिसांचे आभार मानले. पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांचे शिवराय कुळकर्णी यांनी अभिनंदन केले. सोबतच पोलिसांवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध देखील केला.