Pune News | समग्र विचार दर्शन तर्फे पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘आम्ही संघात का आहोत’ या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी (Pune News) पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर प्रमुख उपस्थित होते.
रमेश पतंगे यांनी आपल्या मनोगतात पुस्तकाच्या निर्मितीची पार्श्वभूमी, सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेला गौरव आणि संघात कार्य करताना आलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले, “प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने हे पुस्तक वाचून संघविचार आचरणात आणावा आणि भारताला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे.” तसेच, “ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस लिखित ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक सर्वपक्षीय आमदारांसाठी मार्गदर्शक ठरले, त्याचप्रमाणे रमेश पतंगे यांचे हे पुस्तक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रविंद्र वंजारवाडकर यांनी संघाच्या समाजासाठी असलेल्या योगदानावर प्रकाश टाकत, हे पुस्तक संघ स्वयंसेवकांसह संघ जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचावे, असे मत मांडले.
कार्यक्रमाचे आयोजन समीर कुलकर्णी, निखील पंचभाई, पीयूष कश्यप आणि रश्मिन कुलकर्णी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश खंडेलवाल, तर आभार प्रदर्शन पीयूष कश्यप यांनी केले. समारोप अरुंधती शहा यांच्या वंदे मातरम् गायनाने करण्यात आला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
रूपाली चाकणकरांचं नाव येताच करुणा शर्मांचा गौप्यस्फोट; म्हणाल्या, “त्यांचं काम फक्त नेत्यांना..”
पराभव स्वीकारण्याची मानसिकता नाही, म्हणून राहुल गांधींची रडारड सुरू – Chandrashekhar Bawankule