संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून आरंभ, एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प

नवी दिल्ली – संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृहांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.

कोरोनाच्या नियमांमुळं दोन्ही सभागृहांच्या कामाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. दोन फेब्रुवारीपासून राज्यसभेचं कामकाज सकाळी 10 ते दुपारी 3 तर लोकसभेचं कामकाज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालेल. अधिवेशनाचा पहिला भाग 11 फेब्रुवारीपर्यंत चालेल, तर दुसरा भाग महिनाभराच्या अंतरानं 14 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान होईल.

अधिवेशन काळात कामकाज सुरळीत चालावं यासाठी राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी तसंच सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठका दूरस्थ पद्धतीनं होतील.