सुप्रसिद्ध व्यक्तींनी जाहिरात करण्याबाबतची मार्गदर्शक तत्व केंद्र सरकारने जारी केली

नवी दिल्ली – सुप्रसिद्ध, प्रभावशाली आणि नामवंत व्यक्तींनी समाज माध्यमांवर वस्तू आणि सेवांची जाहिरात करण्याबाबतची मार्गदर्शक तत्व केंद्र सरकारने काल जारी केली आहेत. पैसे किंवा इतर काही मोबदल्याच्या स्वरूपात जाहिराती करणाऱ्यांसाठी जाहिरात विषयक शब्द कसे असावेत याबाबत यात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

जाहिरातींचा मजकूर सुस्पष्ट, ठळक आणि लोकांच्या सहज नजरेला पडेल असा असावा, आपण करत असलेल्या उत्पादनांची आणि सेवांची माहिती आणि त्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेतलेला असावा, जेणेकरून जाहिरातीत त्या उत्पादनाविषयी केले जाणारे दावे खरे आहेत, याची सत्यता त्यांना पडताळून बघता येईल. तसंच ही उत्पादनं किंवा सेवा या व्यक्तींनी स्वतः वापरुन बघाव्यात, अशा सूचनाही यामध्ये करण्यात आल्या आहेत.