Chandrashekhar Bavankule | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुंबईतील नवसाला पावणारा लालबागचा राजाचे दर्शन घेतले. सोमवारी सकाळी (09 सप्टेंबर) आपले जावई सदानंद सुळे (Sadanand Sule) आणि नात रेवती सुळे (Revati Sule) यांच्यासोबत शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी पोहोचले. थोरले पवार दुसऱ्यांदा लालबाग राजाच्या चरणी लीन झाले आहेत. यापूर्वी ज्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर अनेक वर्षांनंतर आज शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला दाखल झाले आहेत.
यावरुन भाजप नेते शरद पवारांवर टीका करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी शरद पवारांवर निशाणा साधताना म्हटले, भाजप आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर काय झाले असा सवाल विरोधी पक्षांनी केला. आपल्या बहुआयामी विकासामुळे, FDI मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे. पण महायुती आल्यानंतर जो मोठा बदल झाला तो म्हणजे लालबागच्या राजाच्या दरबारातून आजचे चित्र समोर आले आहे.
भाजप आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर काय झाले असा सवाल विरोधी पक्षांनी केला.
आपल्या बहुआयामी विकासामुळे, FDI मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे.
पण महायुती आल्यानंतर जो मोठा बदल झाला तो म्हणजे लालबागच्या राजाच्या दरबारातून आजचे चित्र समोर आले आहे. शरद पवारांना देव… pic.twitter.com/eTRssRJbhR— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) September 9, 2024
शरद पवारांना देव आठवले.!!महायुती आल्यानंतरचे हे बदल आहेत. चाळीस वर्षांत पहिल्यांदा असे घडले… याला राजकीय पोळी भाजणे म्हणतात…, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मंकीपॉक्सचा भारतात प्रवेश! परदेशातून परतलेल्या व्यक्तीमध्ये लक्षणे आली आढळून
‘विनेश-पुनिया प्रकरणावर शांत राहा…’, भाजप हायकमांडची ब्रिजभूषण यांना सूचना
मुंबईत उबाठाला खिंडार! आतापर्यंत ५५ नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश