जमिनीच्या १०८ फूट खाली साकारतेय सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानक

जमिनीच्या १०८ फूट खाली साकारतेय सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानक

Pune Metro – पुणे मेट्रोच्या PCMC ते स्वारगेट (१७ किमी) आणि वनाझ ते रामवाडी (१६ किमी) अश्या दोन मार्गिका आहेत. दोन्ही मार्गिका सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे एकमेकांना छेदतात आणि त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक एक महत्वाचे स्थानक म्हणून उभारण्यात येत आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकामधे PCMC ते स्वारगेट मार्गिकेवरील भूमिगत स्थानक आणि वनाझ ते रामवाडी या मार्गिकवरील उन्नत स्थानक आहे. भूमिगत स्थानक ते उन्नत स्थानक यांना एस्किलेटर आणि लिफ्ट यांनी जोडले आहे.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाची खोली ३३.२ मीटर (१०८.५९ फूट) असून हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्थानक आहे. या भूमिगत स्थानकाचे आजून एक वैशिष्ट्य म्हणजे या भूमिगत स्थानकाचे छत ९५ फूट उंच असून तेथे थेट सूर्यप्रकाश वा नैसर्गिक प्रकाश पडेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. असे वौशिष्ठ असणारे हे एकमेव भूमिगत मेट्रो स्थानक आहे. या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाला डेंगळे पूल, कामगार पुतळा आणि पुणे जिल्हा न्यायालय या बाजूनी प्रवाश्याना येण्या-जाण्यासाठी पादचारी वा वाहतुकीचे प्रावधान करण्यात आले आहे. सिव्हिल कोर्ट ते हिंजेवाडी हि पुण्यात बांधण्यात येणारी तिसरी मेट्रो मार्गिका पादचारी पुलाने या स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक हे मेट्रो झाल्याचे मध्यवर्ती स्थानक म्हणून नावारूपाला येईल, त्यामुळे या स्थानकात ८ लिफ्ट आणि १८ एस्किलेटर प्रवाश्यांसाठी बसविण्यात येत आहेत.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाचा एकूण परिसर ११.१७ एकर असून या स्थानकाला येण्या-जाण्यासाठी एकूण ७ दरवाजे लावण्यात येणार आहेत. या स्थानकात मोठ्याप्रमाणावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ड्रॉप अँड गोसाठी एक स्पेशल लेन असणार आहे. मल्टी मोडल इंटिग्रेशन साठी PMPML चा थांबा असणार आहे. या संपूर्ण परिसराचे लँडस्केप अत्यंत आकर्षक असे करण्यात येणार आहे. ज्यामध्ये कारंजी, विविध झाडे, हरित पट्टे, आकर्षक झाडी मोठ्याप्रमाणावर लावण्यात येणार आहे.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी मेट्रो भवनचे काम करण्यात येणार आहे. संपूर्ण पुणे मेट्रोचे प्रशासन या मेट्रो भवन येथील कार्यालयांतून होईल. मेट्रो भवनची इमारत IGBC प्लॅटिनम मानांकनानुसार बांधण्यात येणार असून मेट्रो भवनाच्या फसाटवर मोठ्याप्रमाणात झाडे लावण्यात येणार आहेत.

येत्या दोन महिन्यात फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि PCMC ते सिव्हिल कोर्ट या मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नुकतेच या दोन्ही मार्गांवर चाचणी घेण्यात आली आहे. हे मार्ग प्रवाश्यांसाठी खुले झाल्यावर पुणे व पिंपरी चिंचवड हि जुळी शहरे मेट्रोसारख्या ‘मास ट्रान्झिट वाहतूक व्यवस्थे’ ने जोडली जाणार आहेत. त्यामुळे येथील प्रवाश्यांच्या वेळेची मोठ्याप्रमाणावर बचत होणार आहे. PCMC ते वनाझ या २२ किमीचा प्रवास केवळ ३१ मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार आहे. यामुले चाकरमानी, महिला, विध्यार्थी, जेष्ठ नागरिक यांच्या वेळेची मोठ्याप्रमाणावर बचत होणार आहे. मेट्रोने पर्यावरण पूरक, जलद, सुरक्षित, ऑल वेदर असा पर्याय पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना दिला आहे.

Previous Post

चोराच्या उलट्या बोंबा मारू नका, राजधर्माचं पालन करा – आमदार ॲड. यशोमती ठाकूर

Next Post
115 धावांसाठीही दमछाक! टीम इंडियाचा विडिंजवर रडत-पडत पाच विकेटनं विजय

115 धावांसाठीही दमछाक! टीम इंडियाचा विडिंजवर रडत-पडत पाच विकेटनं विजय

Related Posts
मुलांसाठी टिफिनला बनवा Egg and Potato Cutlet, चव आणि पोषण दोन्ही मिळतील!

मुलांसाठी टिफिनला बनवा Egg and Potato Cutlet, चव आणि पोषण दोन्ही मिळतील!

Recipes For Kids:  बटाटा एक अशी भाजी आहे जी क्वचितच कोणाला आवडत नाही. त्याची चव सर्वांच्याच आवडीची आहे.…
Read More
Hardik Pandya | आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर हार्दिक पांड्या खूश, या खेळाडूला म्हटले खरा हिरो

Hardik Pandya | आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर हार्दिक पांड्या खूश, या खेळाडूला म्हटले खरा हिरो

Hardik Pandya | खराब सुरुवातीनंतर अखेर मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आयपीएल 2024 चा पहिला विजय मिळाला. वानखेडे स्टेडियमवर…
Read More
लाडकी बहिण योजनेत बसणार्‍या सर्व बहिणींना काही कमी पडू देणार नाही | Ajit Pawar

लाडकी बहिण योजनेत बसणार्‍या सर्व बहिणींना काही कमी पडू देणार नाही | Ajit Pawar

Ajit Pawar | लोकसभेला जशा खोट्या अफवा पसरवल्या गेल्या तशा आता खोटयानाटया प्रचाराला बळी पडू नका… माझ्या बहिणीकडून…
Read More