विनोदवीरांना मिळाली महानायकाच्या कौतुकाची थाप, हास्यजत्रेच्या टीमनं महानायक अमिताभ बच्चन यांची घेतली भेट

mhj

मुंबई : सगळ्यांची लाडकी आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी सोनी मराठी वाहिनीची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही अनेक मोठमोठ्या कलाकारांचीसुद्धा आवडती आहे आणि आता या कलाकारांच्या यादीत नाव जोडलं गेलं आहे दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचं. अगदी बरोबर वाचलंत मंडळी. महाराष्ट्राच्या लाडक्या हास्यकलाकारांनी फिल्मसिटी इथं जाऊन अमिताभ बच्चन यांची भेट घेतली.

या वेळी अमिताभजींनी सर्व हास्यवीरांचं आणि हास्यजत्रेचं कौतुक केलं, ‘तुम्ही लोकांना हसवण्याचं अतिशय कठीण असं काम करताहात. ते सतत असंच करत राहा’, असं ते म्हणाले आणि ते स्वतःही हास्यजत्रा पाहत असल्याचं आणि आपल्या कुटुंबालाही हास्यजत्रेबद्दल सांगत असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं.

सर्वांची आवडती हास्यजत्रा ही रविवारी केल्यावर अनेक प्रेक्षकांनी ती पुन्हा चार दिवस व्हावी आणि त्यांचा हास्याचा डोस आठवड्यातून चार दिवस मिळावा, अशी मागणी केली होती. प्रेक्षकांच्या मागणीचा मान राखून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ २० सप्टेंबरपासून, सोमवार ते गुरुवार रात्री ९ वा. असे चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे.

Previous Post
ek thi begum

पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परत आली बेगम…

Next Post
tamasha live

‘प्लॅनेट मराठी’च्या ‘तमाशा लाईव्ह’ चित्रीकरणाचा श्रीगणेशा

Related Posts
girish bapat

पुणे : विमान प्रवाशांसासाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज पाच लाख चौरस फुटांचे टर्मिनल उभे राहणार

पुणे : पुण्यातून विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने होणारी वाढ आणि सध्याच्या इमारतीत गर्दी कमी करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने पाच…
Read More
वडिलांचे संस्कार...! शाहरुखची लेक सुहाना खानने भररस्त्यात थांबून गरिबांची केली मदत

वडिलांचे संस्कार…! शाहरुखची लेक सुहाना खानने भररस्त्यात थांबून गरिबांची केली मदत

बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार किड्सची चर्चा करायची झाल्यास तर त्यात सुहाना खानचे (Suhana Khan) नाव नक्कीच सामील होईल.…
Read More
संजय राऊत

मातोश्रीवरील बैठकीत मोठा राडा, राऊत पडले एकटे, मीडियाशी न बोलताच गेले !

Mumbai – शिवसेनेच्या (Shivsena) खासदारांनी मातोश्रीवर (Matoshree) झालेल्या बैठकीत एनडीएच्या (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना…
Read More