दिल्ली निवडणूकीत कॉंग्रेसला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानेच पुन्हा एकदा शिळया कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न”

दिल्ली निवडणूकीत कॉंग्रेसला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानेच पुन्हा एकदा शिळया कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न"

Anand Paranjape | दिल्ली निवडणूकीत कॉंग्रेसला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानेच पुन्हा एकदा शिळया कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केल्याचा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली.त्यावर आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी जोरदार टीका केली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ३१ खासदार निवडून आल्यानंतर कधीही मतदारयादी सदोष आहे अशाप्रकारची पत्रकार परिषद घेतली नव्हती असा जोरदार प्रतिहल्ला करतानाच सन २०१९ च्या विधानसभेनंतर २०२४ च्या लोकसभेपर्यंत ३२ लाखच मतदार मतदारयादीत वाढले. आणि लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत ३९ लाख मतदार वाढल्याचा आरोप केलात पण लोकसभेनंतर मतदारनोंदणीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आणि ज्यांना – ज्यांना विधानसभा लढायची आहे तो प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला व नवीन मतदारांची नोंदणी केली. त्यात कॉंग्रेसही मागे नव्हती. वाढलेले मतदान हे लोकसभेनंतर विधानसभेला वाढत असते याची जाणीव आनंद परांजपे यांनी करून दिली.

लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त आहेत असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला त्यावर बोलताना कोविडमुळे २०२० मध्ये जनगणना झाली नाही त्यामुळे मतदार आकडेवारीमध्ये तफावत असू शकते. लोकसभेला जी मतदान केंद्रे होती त्यापेक्षा जास्त २५-३० मतदानकेंद्रे निवडणूक आयोगाने अधिक वाढवली होती. महाराष्ट्रातील शहरी भागात मतदान केंद्रे वाढवण्यात आली होती. त्यामुळे मतदारांची यादी देखील वाढली हे स्पष्ट होते असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात लोकसभेनंतर मिळालेल्या यशानंतर मतदारयादीबद्दल किंवा ईव्हीएमबद्दल कधीही कॉंग्रेसने किंवा त्यांच्या घटक पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही याबद्दलही आनंद परांजपे यांनी कॉंग्रेसला फटकारले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवाजी महाराजांवर टिप्पणी करणाऱ्या राहुल सोलापूरकरांना गोळ्या झाडा, उदयनराजे संतापले

दिल्लीच्या विधानसभेचा कौल कुणाच्या बाजूने लागणार? एक्झिट पोलचे आकडे समोर आले

“कराडचा मुलगा कोट्यवधींच्या गाडीत फिरतो, पण मुंडेंच्या मुलाकडे…”, करुणा मुंडेंचे मोठे विधान

Previous Post
आता घरबसल्या भाविकांना मिळणार अष्टविनायक तीर्थयात्रेचा प्रत्यक्ष अनुभव

आता घरबसल्या भाविकांना मिळणार अष्टविनायक तीर्थयात्रेचा प्रत्यक्ष अनुभव

Next Post
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उद्यापासून आठ जिल्हयात 'युवा जोडो अभियान'; सुरज चव्हाण यांची माहिती

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उद्यापासून आठ जिल्हयात ‘युवा जोडो अभियान’; सुरज चव्हाण यांची माहिती

Related Posts
अनिल परब

जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही, असं आम्ही समजू – परब

मुंबई – दिवाळीपासून बेमुदत संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दणका देत 11 हजार कंत्राटी नोकर भरती…
Read More
शिवसेनेत प्रवेश करताच मनीषा कायंदे यांच्यावर CM शिंदे यांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी

शिवसेनेत प्रवेश करताच मनीषा कायंदे यांच्यावर CM शिंदे यांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी

मुंबई – एक वर्षभरापासून सुरू असलेली ठाकरे गटाची ही गळती थांबायचं नाव घेत नाहीये. बंडखोर आमदार आणि खासदारांसह…
Read More
पुनीत बालन यांचा अभिमान आहे, चित्रा वाघ यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव | Chitra Wagh

पुनीत बालन यांचा अभिमान आहे, चित्रा वाघ यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव | Chitra Wagh

Chitra Wagh | महाराष्ट्रात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. त्यातही पुणे शहरांतील गणेशोत्सव नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू…
Read More