ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरू – किरीट सोमय्या

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे..

या निकालावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरू झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान या निवडणुकीवरून आता आरोप -प्रत्यारोपाचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

 

 

दरम्यान, दुसऱ्या बाजूला या विजयानंतर धनंजय महाडिक प्रचंड आनंदी दिसत आहेत. या विजयाची खात्री असल्यानेच देवेंद्र फडणविसांनी आपल्याला उमेदवारी दिल्याचं त्यांनी म्हटलं. शिवाय त्यांना त्यांचे राजकीय विरोधक सतेज पाटील (Satej Patil) यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा “बॅड पॅच संपला!”, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिकांनी दिली.