बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याला भर चौकात फाशी द्यायला हवी होती, असे मत सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) व्यक्त केले. यातून देशभरात शिवरायांच्या काळातील न्याय महाराष्ट्रात अजूनही दिला जातो हा संदेश गेला असता. वाईट कृत्य करणाऱ्यांना धडकी भरावी, अशी शिक्षा द्यायला हवी होती. सरकारने जे काम करावे ते संविधानाच्या चौकटीत राहून करावे. देवेंद्र फडणवीसांकडून खूप अपेक्षा आहेत, त्यांनी असे वागणे योग्य नाही. त्या घटनेत सर्व जण शिंदे आहेत, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी फडणवीसांची नाही का? असा सवाल सुळे (Supriya Sule) यांनी उपस्थित केला. प्रदेश कार्यालय, मुंबई येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावर सविस्तर बोलताना त्या म्हणाल्या की, ही काही वेब सिरीज नाही, हा महाराष्ट्र आहे. हा देश बंदुकीवर नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो. देवेंद्र फडणवीस जितक्या वेळी बंदूक आमच्यावर रोखतील तितक्या वेळा आम्ही त्यांना संविधान दाखवू. यासाठी त्यांच्या गोळ्या खायची वेळ आली तरी चालेल. फडणवीसांचे वागणे हे छत्रपती शिवराय आणि शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला अशोभनीय असल्याचे त्या म्हणाल्या.
अमित शहांनी स्वतः कबुल केले की ते स्वतःहून जिंकू शकत नाही. त्यांचे एकच लक्ष्य आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांना हरवायचे. त्यांनी काहीच केले नाही हाच याचा अर्थ आहे. आम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी लढतो आहोत आणि भाजपचे नेते शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी लढत आहेत. मराठी माणूस मोठा होतोय हे त्यांना पाहावले जात नाही. म्हणून त्यांच्या पराभवासाठी ही लोकं लढत आहे. पाच वर्षांपूर्वीदेखील अशीच शरद पवार साहेबांना ईडीची नोटीस पाठवली होती याची आठवण सुप्रियाताईंनी यावेळी केली. मराठी माणसांच्या विरोधातील हे सरकार आहे, त्यांना मराठी माणसांनी मोठे झालेले चालत नाही. त्यांना हरवणे शक्य नसेल तर पक्ष फोडा ही एकच गोष्ट यांच्याकडे राहिली आहे. त्यामुळे शाहांच्या वक्तव्याबद्दल काही वाटले नाही. ते पक्ष आणि चिन्ह घेऊन जातील पण मराठी माणसांचा स्वाभिमान कधीही घेऊन जाऊ शकणार नाही. असे सुप्रियाताई सुळे यांनी अधोरेखित केले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
अशा अस्मानी संकटाचे घाणेरडे राजकारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच करू शकते; चंद्रकांत पाटलांचा टोला
हे एखादे षडयंत्र तर नाही ना? फडणवीसांच्या कार्यालयाच्या तोडफोडीची चौकशी करा
केंद्रात मंत्री बनण्याची ऑफर दिल्यास काय कराल? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं