‘कोर्टाने नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत असे केवळ मत नमूद केले आहे, त्यांचा हा निर्णय नाही’

मुंबई – मनी लाँड्रिंगच्या (money laundering case) आरोपांचा सामना करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (ED on Nawab Malik) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशेष न्यायालयाने नवाब मलिकविरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. यावर कोर्टाने नवाब मलिक यांचे डी-गँगशी (d company) संबंध होते असं निरीक्षण नोंदवलं आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) यांचा थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग होता असेही न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय नवाब मलिकांनी गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी कट रचल्याचा ठपका ईडीने (ED) ठेवला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी हसीना  पारकरसोबत (Hasina Parkar) वारंवार बैठका घेतल्या आणि मनी लाँड्रिंग केलं असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे.

दरम्यान, न्यायालयातील या घडामोडींवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांची मलिक यांच्यामुळे चांगलीच गोची झाली आहे. यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, माझ्या मनात मलिक यांच्या इंटेग्रिटीबद्दल (Integrity) अशा चुकीच्या लोकांशी संबंध ठेवण्यासंबंधी विश्वास नाही. असे आरोप केले जातात. याचे उदाहरण मी स्वत: आहे. माझ्यावरही असेच अनेक आरोप केले होते.त्यामुळे नाही त्या गोष्टींना लक्ष्य करून कारण नसताना समाजा समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न दिसतोय. कोर्टाने नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत असे केवळ मत नमूद केले आहे, त्यांचा हा निर्णय नाही. गेली अनेक वर्षे मी नवाब मलिक यांना ओळखतो.

शेवटी ज्यांनी आरोप केले त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांनी विधिमंडळात भाषण करून सांगितले की आम्ही जी टीका करत होतो त्यात काही तथ्य नाही. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून बोलत होतो. माझी खात्री आहे संपूर्ण चित्र समोर आल्यानंतरच नवाब मलिक यांची स्थिती स्पष्ट होईल. असं ते म्हणाले.