तयारीला लागा : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख ठरली

student

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) 20 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी घेण्यात येणार आहेत.

शासनमान्य शाळांमधून 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन परीक्षा आणि शासकीय विद्यानिकेतन परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी तसेच आठवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in आणि https://mscepuppss.in या संकेतस्थळावर 1 डिसेंबर 2021 पासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वरील सर्व परीक्षा 20 फेब्रुवारी रोजी सर्व जिल्ह्यात एकाच वेळी घेण्यात येतील. परीक्षेची अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी असे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM

Previous Post
सात दिवसांत शेतकऱ्यांना भरपाई द्या,अन्यथा गुन्हे दाखल करू; कृषीमंत्र्यांचा विमा कंपन्यांना इशारा

सात दिवसांत शेतकऱ्यांना भरपाई द्या,अन्यथा गुन्हे दाखल करू; कृषीमंत्र्यांचा विमा कंपन्यांना इशारा

Next Post
विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच : नाना पटोले

विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच : नाना पटोले

Related Posts
निर्भीड पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या मुजोर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

निर्भीड पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या मुजोर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

Attack on Dnyaneshwar Choutmal | पुण्यातील गोखलेनगर येथे आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार ज्ञानेश्वर चौतमल आणि कॅमेरामन निखिल…
Read More

तितकेच चाबकाचे फटके त्याला द्यायला हवेत, मुकेश खन्ना यांनी वीर दास वर काढली भडास

मुंबई : कॉमेडियन व अभिनेता वीर दासने भलेही त्याच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी माफी मागितली असो, पण अद्यापही लोकांचा राग…
Read More
केपटाऊनमध्ये 'राम सिया राम...'चा नारा, विराट कोहलीची रिऍक्शन झाली व्हायरल

केपटाऊनमध्ये ‘राम सिया राम…’चा नारा, विराट कोहलीची रिऍक्शन झाली व्हायरल

Virat Kohli Reaction Viral: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा…
Read More