गंगाखेड येथे संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी सोहळा ऊत्साहात साजरी

गंगाखेड / विनायक आंधळे – संत सावतामाळी यांनी आपले कर्म सांभाळत भक्ती केली. ती भक्ती एवढी ऊच्च कोटीची होती, की स्वतः पंढरपूरचे (Pandharpur) पांडूरंग सावता भेटीस त्यांच्या आरण गावात आले. यावरून आपणही बोध घेतला पाहिजे. सन्याशी होवून जंगलात भटकण्यापेक्षा, तीर्थ-वाऱ्या करण्यापेक्षा आपलं कर्म करत देव भक्ती करावी, असे आवाहन ह.भ.प. रोहिदास महाराज मस्के (Rohidas Maharaj Muske) यांनी श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज (Shri Sant Shiromani Savata Mali Maharaj) यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रोत्यांना केले.

कांदा मुळा भाजी अवघा विठाई माझी असे म्हणत त्यांना आपल्या कामातच विठोबाहोता. आपल्या कामातच देव शोधण्याचा संदेश त्यांनी दिला आहे. संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते. यांचा काळ इ.स. १२५० ते १२९५चा आहे. ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सावपणा असा याचा अर्थ होतो.

वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त 27-07-2022 बुधवार रोजी गंगाखेड (Gangakhed)  शहरातील खडकपुरा गल्लीतील संताजी महाराज मठ येथे (Santaji Maharaj Math) उत्साहात साजरी करण्यात आली. कीर्तन, भजन, महाप्रसादाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाजातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.