निवडणूक आयोगानं सुरु केली लोकसभा निवडणुकांची तयारी

ECI :  निवडणूक आयोगानं 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि चालू वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांच्या आधी देशभरात टप्प्याटप्प्यानं ईव्हीएम आणि पेपरट्रेल मशीनची प्रथम-स्तरीय तपासणी सुरू केली आहे.

प्रथम टप्प्यातल्या या तपासणी दरम्यान, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड च्या अभियंत्यांकडून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं आणि पेपर ट्रेल मशीन यांत्रिक दोषांसाठी तपासल्या जातील.

संपूर्ण भारतात ही तपासणी टप्प्याटप्प्यानं होणार असून, त्यांचं वेळापत्रक सर्व राष्ट्रीय आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षाना कळवण्यात येतं.तसंच या पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत दोन्ही मशीन तपासण्यांसाठी अभिरूप मतदानही घेतलं जातं. अभिरूप मतदान हा प्रथम-स्तरीय तपासणी प्रक्रियेचा भाग आहे.आकाशवाणीने याबाबत वृत्त दिले आहे.