एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच; सरकार त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पहात नाही – जयंत पाटील

मुंबई – एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत… दंगा करत आहेत… अर्वाच्च बोलत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

परिवहन मंत्री अनिल परब कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करत असून हे प्रश्न लवकर सुटावेत, हीच राज्यसरकारची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आजपर्यंत सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने ही त्यांच्या संघटनांकडून व्हायची. कोणताही राजकीय पक्ष अशा संघटनांमध्ये पुढे जाऊन आंदोलन करत नाही. सर्व राजकीय पक्षांनी या मर्यादा पाळल्या होत्या. परंतु भाजप ऐनकेन प्रकारे सरकारच्या विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संघटना उत्सुक नाही दिसल्यावर स्वतःच पुढे येऊन आंदोलन करायला लागले आहेत अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

भाजपच्या नेत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात होत असलेली घुसखोरी आणि त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचाही समाचार जयंत पाटील यांनी घेतला.

https://youtu.be/iLGbybjU9tc

Previous Post

विधानसभेतील बहुमत जोपर्यंत आहे तोपर्यंत सरकार जाणं शक्य नाही – जयंत पाटील

Next Post

कंगना राणावत विरोधात कॉंग्रेसतर्फे पुण्यात आणखी एक तक्रार दाखल

Related Posts

तुम्हीही दिवसभरातून ४-५ वेळा चहा पिताय, आताच सवय बदला! होऊ शकतात ‘हे’ आजार

Health Tips: चहा (Tea)… हा सर्वांच्या आवडीचा असतो. सकाळी उठलं की घरात वडिलधाऱ्यांपासून लहान मुले-मुलीही चहा ब्रेडचा आस्वाद…
Read More
कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून रोजगार वाढीसाठी प्रयत्न - मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून रोजगार वाढीसाठी प्रयत्न – मंगलप्रभात लोढा

मुंबई : राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात…
Read More

महाराष्ट्रातील 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडी जिंकणार; संजय राऊत यांची डरकाळी

Mumbai – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय होणार आहे हे स्पष्टच…
Read More