Rohit Pawar | इंजिन स्वाभिमानाचा मार्ग विसरले; रोहित पवारांची खोचक टीका

Rohit Pawar | महाराष्ट्रातील शिवतीर्थ शिवाजी पार्कवर शुक्रवारी (17 मे) NDA मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एनडीएच्या रॅलीला संबोधित केले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका विरोधकांना पटलेली नाही. यातूनच आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) राज ठाकरेंवर टीका केली आहे. मराठी स्वाभिमानाकडे धावणारा #लाव_रे_तो_व्हिडीओ ते दिल्लीसमोर शरण जाण्यासाठी स्वतःहून पळत जाणारा #बिनशर्थ_पाठींबा असा हा इंजिनचा प्रवास मराठी मनाला कधीही पटणारा नाही. #इंजिन सद्याला स्वाभिमानाचा मार्ग विसरले असले तरी स्वतःचेच हे व्यंगचित्र बघून गतकाळात घेतलेली भूमिका नक्कीच स्मरेल ही अपेक्षा .असे म्हणत पवार यांनी टोला लगावला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप