वडील दारू पिऊन सतत आईला मारहाण करायचे; अल्पवयीन मुलाने बापाचा काटाच काढला

दौंड – वडील दारू पिऊन सतत आईला  मारत असल्याची  चीड आल्याने (father used to beat his mother constantly by drinking alcohol) अल्पवयीन मुलाने मित्राच्या मदतीने जन्मदात्या वडिलांना ठार मारल्याची धक्कादायक घटना वरवंड येथे घडली आहे . यातील खून झालेल्या व्यक्तीचे  राजेंद्र म्हस्के (Rajendra Mhaske) असून या प्रकरणातील त्यांचा मुलगा  व त्याचा मित्र स्वस्तिक संजय खडके (Sanjay Khadake) (वय-२१ वर्षे ) राहणार (वरवंड ता.दौंड )यांना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली आहे.

या बाबत पोलिसांनी दिली माहीत अशी की, राजेंद्र म्हस्के यांचे जुन्या गाड्या खरेदी विक्री करण्याचे कार्यालय चौफुला येथे आहे. मागील काही दिवसांपूर्वी ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी गौरी राजेंद्र म्हस्के यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली  होती . या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत होते .

तपास करीत असताना राजेंद्र म्हस्के यांच्या मुलाच्या सांगण्यात पोलिसांना विसंगती आढळून आली . यावेळी पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदर अल्पवयीन मुलाने वडील सतत दारू पिऊन आईला मारहाण करायचे याचा राग मनात ठेवून मित्र स्वस्तिक संजय खडके याच्या मदतीने वडिलांना ठार मारले असल्याचे पोलिसांना सांगितले .

दिनांक २६ मे रोजी  संजय म्हस्के यांनी त्यांची पत्नी व अल्पवयीन मुलास दारू पिऊन मारहाण केली होती. या मारहाणीनंतर ते बेडरुममध्ये जाऊन झोपले होते . यावेळी संजय म्हस्के यांच्या मुलास खूप राग आला होता . यावेळी सदर अल्पवयीन मुलाने दररोजच्या या मारहाणीतुन वाचण्यासाठी वडिलांना ठार मारण्याचे ठरवले होते. यावेळी अल्पवयीन मुलाने त्याचा मित्र स्वस्तिक संजय खडके ( रा. जनाई मळा , वरवंड) यास मोबाईल वरून कॉल करून वडिलांचा त्रास कायमचा संपवायचा आहे. तुला दिलेले ५० हजार रुपये परत देऊ नको परंतु वडिलांना मारून टाक असे सांगितले .

यानंतर दि. २७ मे रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सदर अल्पवयीन मुलगा आणि स्वस्तिक खडके याने संजय म्हस्के (Sanjay Mhaske) हे झोपलेले असताना लोखंडी हातोडी च्या साह्याने डोक्यात मारले तसेच त्यांच्या तोंडावर उशी दाबून धरली . यानंतर दोघांनी मिळून सदर बॉडी पोत्यात भरून , त्यावर गोधडी गुंडाळली . स्वस्तिक खडके याच्या  मारूती कंपनीची सेलेरिओ कार नंबर ( एमएच ४२ एएक्स ३९८७ ) च्या डिकीमध्ये टाकली. यानंतर स्वस्तिक खडके निघून गेला. यानंतर संध्याकाळी त्याने म्हस्के यांच्या अल्पवयीन मुलास सदर बॉडी येडशी (जि-उस्मानाबाद ) येथील जंगलात टाकल्याची माहिती दिली .

यानंतर पोलिसांनी स्वस्तिक खडके यास ताब्यात घेतले असता त्याने सदर हकीकत बरोबर असल्याची असून दोघांनी मिळून खून केल्याचे सांगितले. डेथबॉडी उस्मानाबाद येथील येडशी च्या वनविभागाच्या जंगलात टाकल्याची माहिती पोलिसांना दिली . यानंतर पोलीस पथक स्वस्तिक खडके, अल्पवयीन मुलगा आणि राजेंद्र म्हस्के यांच्या पत्नी गौरी म्हस्के यांना घेऊन येडशी उस्मानाबाद येथे गेले. सदर परिसर हा उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असल्याने तेथील पोलीस स्टेशन ला याबाबत माहिती दिली . त्यावेळी उस्मानाबाद पोलिसांनी सदर पोलीस पथकास आम्हाला एक पुरुष जातीचे प्रेत असल्याबाबत माहिती मिळाली आहे तिकडेच या असे सांगितले .

त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वस्तिक खडके याने असलेल्या पुरुष जातीच्या प्रेताकडे बोट दाखवून सदर बॉडी राजेंद्र म्हस्के यांची असून वरवंड येथून  गाडी मधून आणून टाकली असल्याचे सांगितले . यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर खून प्रकरणी सरकारतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी म्हस्के यांचा अल्पवयीन मुलगा आणि स्वस्तिक संजय खडके यांच्या विरुद्ध भादवी कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे फिर्याद दिली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ .अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक  मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे , पोलीस हवालदार घनश्याम चव्हाण ,सोमनाथ सुपेकर ,समीर भालेराव आणिपोलीस मित्र आप्पा भंडलकर यांनी केली आहे.