अल्जेरियन बॉक्सर इमान खलिफने (Iman Khalifa) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकले. अल्जेरियन बॉक्सरने महिला गटात सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिकदरम्यान इमानच्या लिंगावरून वाद झाला होता. आता जे वैद्यकीय अहवाल समोर आले आहेत ते खरोखरच धक्कादायक आहेत, ज्यामध्ये इमानच्या आत अनेक पुरुषांचे अवयव असल्याचे सांगण्यात आले आहे.
दस्तऐवजानुसार, खलिफामध्ये अंतर्गत अंडकोष आणि XY गुणसूत्र आहेत, जे 5-अल्फा रिडक्टेस अपुरेपणा नावाचे विकार दर्शवतात. ऑलिम्पिक दरम्यान, इमान खलीफ विरुद्ध खेळलेल्या अनेक महिला बॉक्सर्सनी इमानमध्ये XY क्रोमोसोम असल्याचे हावभावांद्वारे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. पॅरिसमधील क्रेमलिन-बिसेट्रे रुग्णालय आणि अल्जियर्समधील मोहम्मद लमाइन डेबघिन रुग्णालयातील तज्ञांनी 2023 च्या अहवालात अनेक खुलासे केले आहेत.
अहवालात इमानच्या जैविक वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे, जसे की अंतर्गत अंडकोषांचे अस्तित्व आणि गर्भाशयाची अनुपस्थिती. याशिवाय, रेडक्सच्या अहवालानुसार, एमआरआयमध्ये इमानच्या मायक्रोपेनिसची उपस्थिती देखील समोर आली आहे. आता अहवाल समोर आल्यानंतर इमानवर काय कारवाई होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने बंदी घातली होती
इमान खलिफच्या (Iman Khalifa) लिंगावर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने 2023 मध्ये तिच्यावर बंदी घातली आहे. दिल्लीतील बॉक्सिंग असोसिएशनने इमानला जागतिक अजिंक्यपद सुवर्णपदकाच्या सामन्यात सहभागी होण्यास बंदी घातली होती.
लिंग विवादावर खलीफ यांनी यापूर्वी काय म्हटले आहे?
तिच्या लिंग विवादावर इमान खलीफेने यापूर्वी म्हटले होते की, “मी इतर महिलांप्रमाणेच एक स्त्री आहे. मी स्त्री म्हणून जन्माला आले, मी स्त्रीप्रमाणे जगते आणि मी पात्र आहे.”
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मनोज जरांगे पाटलांची विधानसभा निवडणुकीतून माघार, एकही उमेदवार उभा करणार नाही | Manoj Jarange Patil
“गद्दारच मुख्यमंत्री होतात”, भाजपाच्या आमदाराच्या वक्तव्यामुळे महायुतीत नव्या वादाची शक्यता!