Devendra Fadnavis | छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात ‘छावा’चे शो हाऊसफुल होत आहेत. मात्र या चित्रपटाच्या तिकिटांच्या दरांमुळे सामान्य मराठी प्रेक्षकांना तो पाहणे कठीण जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची व बलिदानाची गाथा अनुभवण्याची संधी महाराष्ट्रातील नागरिकांना मिळाली यासाठी ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यात यासंदर्भात वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त होऊ शकत नाही, असे फडणवीस यांनी सांगत त्याचे कारण दिले आहे.
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, वीरता आणि विद्धवता प्रचंड होती. परंतु इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. आता त्यांच्यावर अतिशय चांगला चित्रपट आला आहे. ऐतिहासिक असा हा चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे. परंतु महाराष्ट्रात करमणूक करच नाही. इतर राज्य जेव्हा एखादा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) करतात तेव्हा ते करमणूक कर माफ करतात. परंतु महाराष्ट्राने 2017 सालीच करमणूक कर नेहमीसाठी रद्द केला. त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही. आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी आम्हाला अधिक काय करता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करु.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शिवस्मारक केवळ घोषणांपुरते! महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान थांबवा! शरद पवार पक्षाची निदर्शने
तुमच्याकडे परिवारवाद तर आमचा महाराष्ट्रवाद!, शिंदे यांचा रत्नागिरीतून उबाठावर हल्लाबोल
मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रभरात करमुक्त व्हावा! लांडगे यांची मागणी