बिग बॉस मराठीचे चौथे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बिग बॉस मराठीने तिसऱ्या पर्वात मोठी धम्माल उडवून दिली. हे पर्व वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत राहिले. त्यामुळे चौथे पर्व आता कधी येणार अशी विचारणा होत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी चौथ्या पर्वाविषयी मोठी घोषणा केली आहे.मांजरेकर म्हणतात, बिग बॉस हिंदी प्रमाणेच बिग बॉस मराठी विषयी सर्वांना प्रचंड उत्सुकता आहे. प्रेक्षकांना देखील या पर्वाचे वेड लागले आहे. पण आता मराठी लोकांना देखील बिग बॉस मराठीचे वेड लागले आहे. तिसऱ्या पर्वाचे अजून देखील अनेक मीम्स व्हायरलं होत आहेत, असे मांजरेकर म्हणतात. आता चौथे पर्व मे महिन्यांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व नुकतेच पार पडले आहे.कोरोनाचा संसर्ग असताना या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या पर्वात विशेष काळजी घेण्यात आली होती.प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे, कीर्तनकार शिवलीला पाटील असे अनेक प्रसिद्ध चेहरे या पर्वात होते. विशाल निकम या पर्वाचा विजेता ठरला होता.