सरकार तुमचंच आहे, सरकारला लुटू नका; अजितदादांचा शेतकऱ्यांना सल्ला 

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत येत असतात. कधी वादग्रस्त विधानांमुळे, कधी वादग्रस्त कृतीमुळे तर कधी घोटाळ्यांचे आरोप झाल्याने ते नेहमीच चर्चेत असतात. आता अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे.

बारामतीतील माळेगाव येथे सोमवारी राजहंस संकुल संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. रस्ता रुंदीकरणाच्या मुद्यावर बोलताना अजित पवार यांनी भाष्य केले. यावेळी बोलताना सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका असा सल्ला अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला. आता याच सल्ल्याची उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

रस्ता रुंदीकरणामध्ये लोकांनी रस्त्याच्या बाजूला झाडं लावलीत. जो जमिनीचा भाग रस्ता रुंदीकरणात जाणार आहे. त्याच ठिकाणी लोकांनी झाडं लावली आहेत. दुसऱ्या बाजूला झाडे लावली नसल्याचे दिसून आले. यावर प्रांतधिकारी यांना विचारलं तर त्यांनी आंबा, नारळ याची झाडं लावली की जास्त पैसे मिळतात. त्यामुळे लोकं अशी झाडं लावतात असे सांगितले. त्यावर अजित पवार यांनी सरकार पण तुमचंच आहे सरकारला लुटू नका शेतकऱ्यांना सल्ला दिला.