New Parliament of India : देशाला मिळालं नवं संसद भवन, पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

New Parliament of India- दिल्लीतल्या संसदेच्या नव्या वास्तूचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. साधूसंतांच्या मंत्रोच्चारात हा कार्यक्रम सोहळा पार पडला. नव्या संसदेचं लोकार्पण करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सेंगोल (राजदंड)ची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर सर्व धर्मीयांची प्रार्थना पार पडली.

उत्तम वास्तुकलेचा नमुना असणारी ही इमारत देशाच्या समृद्धीचं आणि प्रगतीचं प्रतीक ठरणार आहे. या वास्तुतल्या कार्यालयीन व्यवस्थेत अधुनिक आणि नवीनतम तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे.या वास्तुचा संपूर्ण परिसर 65 हजार चौरस मीटर क्षेत्रात विस्तारला आहे. त्यामध्ये प्रादेशिक कला, सांस्कृतिक वारसा आणि हस्तकला यांचा वापर केला आहे. पुर्वीच्या संसद भवनाच्या तुलनेत तीनपट विस्तार असलेल्या लोकसभेच्या नव्या सभागृहाची आसनक्षमताही वाढली आहे. तिथे 888 आसनक्षमता आहे. राज्यसभेच्या सभागृहाची क्षमता 384 आहे.