बॉलीवूडवर भारी पडले साऊथ सिनेमे, ‘हे’ आहेत २०२२मध्ये धमाका करणारे टॉप-१० चित्रपट

IMDb List 2022: IMDb ने 2022 मधील टॉप 10 चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीत असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. तसेच या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. अगदी टीकाकारांनीही या चित्रपटांची उघडपणे प्रशंसा केली. या यादीत फक्त एकच हिंदी चित्रपट The Kashmir Files पहिल्या 10 मध्ये आहे, तर एसएस राजामौली यांचा RRR पहिल्या क्रमांकावर आहे.

2022 च्या टॉप10 सिनेमांच्या यादीत एसएस राजामौली यांची आरआरआर आघाडीवर आहे. या चित्रपटात राम चरण, जूनियर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगण आणि श्रिया सरन यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. ज्यांनी चित्रपट पाहिला त्या सर्वांनी त्याचे कौतुक केले. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर काम सुरू आहे. या चित्रपटाने सर्व बॉलीवूड चित्रपटांना मागे टाकले आहे.

यावर्षीच्या IMDb च्या टॉप10 सिनेमांची यादी
1. आरआरआर
2. काश्मीर फाइल्स
3. K.G.F: चाप्टर 2
4. विक्रम
5. कांतारा
6. रॉकेट्री: नंबी इफेक्ट
7. मेजर
8. सीता रामम
9. पोनानियन सेल्वन
10. 777 चार्ली

टॉप10 भारतीय वेब सिरीजची यादी
1 पंचायत (8.9)
2 दिल्ली क्राइम (8.5)
३ रॉकेट बॉयझ (८.९)
४ ह्यूमन (७.९)
5 अपहरण (8.3)
6 पिगी बँक (9.1)
7 NCR डेज (9.1)
8 अभय (8.1)
9 कॅम्पस डायरी (8.9)
10 कॉलेज रोमांस (8.4)