घर घेण्यासाठी गेलेल्या वकिलाला आधी जात विचारली; अनुसूचित जातीचे असल्याचे सांगताच….

औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील चिकलठाणा भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवीन रो हाऊस बुक करण्यासाठी गेलेल्या एका वकिलाच्या कुटुंबाला बांधकाम साइटवरील कर्मचाऱ्यांकडून आधी जात विचारण्यात आली. त्यांनी अनुसूचित जातीचे असल्याचे सांगताच या कुटुंबाला कर्मचाऱ्यांनी घर दाखवण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी वकील  महेंद्र गंडले यांनी तक्रार दाखल केली आहे.

महेंद्र यांनी  सांगितले की, ते 7 जानेवारी रोजी पत्नी, मुलांसह भाईश्री गुपची भूमी विश्वबन येथील रो हाऊसची साइट बघण्यासाठी गेले. येथील रो हाऊस आवडल्यानंतर त्यांनी साइटवरील कर्मचाऱ्यांना त्याबद्दल चौकशी केली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी गंडले यांना जात विचारली.  गंडले यांनी अनुसूचित जातीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर तुमच्या मजातीच्या लोकांना घर देता येणार नाही, असे त्याने सांगितले. तसेच त्यानंतर त्यांनी बिल्डरचे कार्यलय गाठून घराची चौकशी केली, तिथेही मला जात विचारून घर नाकारण्यात आल्याचे गंडले यांनी सांगितले.

बिल्डर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांविरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्राची मान या सर्व घटनेमुळे खाली गेली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या घटनेमुळं संताप व्यक्त केला जात आहे.