800 वर्ष जुन्या परंपरेच्या सोहळ्याकडे माध्यमांनी फिरवली पाठ…सोशल मीडियातून उमटल्या प्रतिक्रिया

पुणे – गावागावातून निघालेली भक्तीरसाने भारलेली मने, मुखांत अखंड हरीनामाचा गजर, टाळमृदुंगाचा ताल, तुळशी वृंदावनाची साथ आणि प्रत्येक माणसांत माऊलीचे रुप पाहण्याची दृष्टी घेऊन निघालेला सोहोळा आपल्या ८०० वर्षांची परंपरा सांभाळत भावपूर्ण वातावरणात भक्तिगंगेचा ओघ वाहत आहे.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे (Palkhi of Sant Shrestha Dnyaneshwar Maharaj and Jagadguru Sant Tukaram Maharaj) काल (२२ जून २०२२) पुणे शहरात आगमन झाले. कोरोना प्रतिबंध शिथिल झाल्याने दोन वर्षांनंतर यंदाचा पालखी आणि वारी सोहळा खास आहे. या वर्षी अतिशय उत्साहात हा दिंडी सोहळा सुरु आहे. राज्यभरातून लाखो वारकरी देहू आणि आळंदी (Dehu and Alandi) येथे वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत. आषाढी एकादशीला या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूरात दाखल होतील.

काल, पुण्यनगरीत दाखल झालेल्या पालखी सोहळय़ावर पुणे बार असोसिएशनच्या वतीने हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी (Flower showers by helicopter) करण्यात आली. संचेती रुग्णालयाजवळील यशवंतराव चव्हाण स्मृती शिल्प चौक (Yashwantrao Chavan Smriti Shilpa Chowk) येथे राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी तीस किलो फुलांचा वापर करण्यात आला. पुण्यातील न्यायाधीश आणि वकील अशा एकंदर तीनशेहून अधिक भाविकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.

टाळ-मृदुंगा सोबत ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड गजर करणाऱ्या या भक्तिमय वातावरणात पुणेकरांनी या पालखी सोहळ्याचे, वारकऱ्यांचे स्वागत केले. ठिकठिकाणी पुणेकरांनी वारकऱ्यांसाठी फळे, बिस्कीटे, राजगिऱ्याचे लाडू, पाणी असा अल्पोपहार वितरित करून संतसेवा करण्याची संधी साधली.

८०० वर्ष जुनी परंपरा असलेल्या पंढरपूर वारी (Wari of Pandharpur with a tradition of 800 years) मार्गाने ३-४ लाख वारकरी पुण्यात दाखल होत असतात. परंतु, काल पुण्यात दाखाल झालेल्या या पालखी सोहळ्याकडे मात्र माध्यमांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. सध्या ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहेत त्या दाखवताना माध्यमकर्मी वारीचे वार्तांकन (Wari broadcast) करणे विसरुन गेले की काय? अशी शंका सामान्य नागरिकांच्या मनात आल्याशिवाय राहिली नाही. या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. माध्यम फक्त TRP च्या मागे धावतांना दिसत आहेत. परंतु माध्यमांना 2 वर्षानंतर होणार्‍या ह्या भव्य अशा सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने वारकरी (Warkari), धारकरी आणि सामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.