पुढचा मुख्यमंत्री प्रहारचा होईल, बच्चू कडू यांचा दावा 

Mumbai – महाराष्ट्रात विधान परिषदेच्या १० जागांसाठी सोमवारी म्हणजेच आज मतदान होत आहे. या निवडणुका 10 दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच रंजक ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत इतर पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले असले तरी मुख्य लढत काँग्रेसच्या दुसऱ्या आणि भाजपच्या पाच उमेदवारांमध्ये आहे.ही निवडणूक देखील रंजक असेल कारण मतदान गुप्त असेल, त्यात कोणाला मतदान केले हे शोधणे कठीण होईल.

गुप्त मतदानावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही खडाजंगी झाली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यामध्ये MVA शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी प्रत्येकी दोन आणि भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी किमान २६ मतांची आवश्यकता आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी एका बाजूला घडत असताना आज  मंत्री बच्चू कडू यांनी जोरदार टोलेबाजी केली. येणारा काळ हा अपक्ष आमदारांचा असणार आहे. हम बोलेंगे वैसे ही सरकार चलेगा, असं बच्चू कडू म्हणाले. अपक्षांचा झटका काय असतो आणि परिणाम कसे असतील ते विधान परिषद निवडणुकीत दिसणार आहे, असंही सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं.

अपक्ष आमदारांचं वाढलेलं वजन अधोरेकित करुन झाल्यावरही पत्रकारांच्या प्रश्नांची यादी संपत नव्हती. शेवटी जाता जाता पुढच्यावेळी आमचंच राज्य येणार आहे, पुढचा मुख्यमंत्री प्रहारचा होईल, असं बच्चू कडू हसत हसत म्हणाले.