Pune Syed Nagar Crime | सय्यद नगर परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या तीन साथीदारांची पोलिसांनी पायी धिंड काढली. या कारवाईचा उद्देश नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि आरोपींच्या विरोधात तक्रार करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा होता.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये सद्दाम सलीम पठाण, एजाज युसूफ इनामदार, आणि नदीम बाबर खान यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना त्यांच्या गुन्ह्याच्या तपासासाठी हडपसर येथील सर्वे नंबर 75/6 या ठिकाणी नेण्यात आले होते.
सदर आरोपींची सय्यद नगर भागात ( Pune Syed Nagar Crime) दहशत असल्याने पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा देत, नागरिकांना पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन केले आहे. यामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचा पोलिसांचा प्रयत्न असून, पुढील कारवाई वेगाने करण्यात येणार आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मेहुल चोक्सीच्या अटकेवर खासदार सुप्रिया सुळे यांची लक्षवेधी प्रतिक्रिया
पश्चिम बंगाल वक्फ कायदा विरोधातील हिंसाचार प्रकरणात अटक संख्या 150 वर
पुढे कोणतीही तनिषा भिसेसारखी घटना घडू नये यासाठी पावले उचलणार – Rupali Chakankar