परमबीर-वाझे भेटीची चौकशी होणार, एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही – वळसे पाटील 

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) हे चांदीवाल कमिशनसमोर (Chandiwal Commission) चौकशीला जाण्यापूर्वी भेटल्याचे समोर आले आहे. यानंतर आता एकच गदारोळ सुरु झाला असून विविध आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह व सचिन वाझे हे चांदिवाल कमिशनसमोर चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळतेय हे नियमाला धरुन नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

आता या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मंगळवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ( Dilip Walse-Patil) यांनी दिली. एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीतसुद्धा सरकारने जनतेचे हित जपत सर्वांची काळजी घेतली – येवले

Next Post

विधान परिषदेच्या निवडणुकीतदगाफटका टाळण्यासाठी भाजपाने नगरसेवकांना गोव्याला पाठवले

Related Posts
विनोद तावडे प्रकरणात निवडणूक आयोगाला सापडले तब्बल 'इतके' पैसे

विनोद तावडे प्रकरणात निवडणूक आयोगाला सापडले तब्बल ‘इतके’ पैसे

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या काही तासांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन…
Read More
Pune Crime News : 'माझी झाली नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही'; म्हणत पुण्यात तरुणीला भररस्त्यात मारहाण

Pune Crime News : ‘माझी झाली नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही’; म्हणत पुण्यात तरुणीला भररस्त्यात मारहाण

Boy Beats Girl, Pune Crime: लग्नास नकार दिल्याच्या रागातून 19 वर्षीय (Pune Crime News) तरुणीला रस्त्यात अडवून तिला…
Read More
uday samant

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उदय सामंत यांना दिले ‘हे’ वचन

नवी दिल्ली : कोकणाच्या विकासासाठी आणि बंदरास जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड या रस्त्याचे चौपदरीकरण लवकरच होणार असल्याची माहिती…
Read More