DCM Shinde | बाळासाहेबांच्या विचारांना धक्का देणारे आणि बाळासाहेबांचे विचार सोडणारे तसेच पक्षातील चांगल्या लोकांना धक्का मारुन बाहेर काढणारे जे नेते आहेत त्यांना विधानसभा निवडणुकीत जनतेनेच धक्का देऊन कायमचे घरी बसवले, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Shinde) म्हणाले की, शेअर बाजारात ज्या कंपनीची विश्वासार्हता असते त्याच कंपनीचे शेअर लोक खरेदी करतात. बाजारात कितीही उलाथापालथ झाली तरी या शेअरवर कोणताही परिणाम होत नाही. तशीच आमची शिवसेना आहे. शिवसैनिक आमच्या सोबत आहेत. बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघेंचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना आहे. त्यामुळे राज्यभरातून वेगवेगळ्या पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
ते पुढे म्हणाले की,बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा आपण एक सामान्य कार्यकर्ता आहोत. मात्र काहीजणांनी मला हलक्यात घेतले. त्यामुळे २०२२ मध्ये त्यांचा टांगा पलटी केला. राज्यात डबल इंजिनचे सरकार आणले. विधानसभेतील भाषणात मी २०० हून अधिक जागा निवडून आणू, अशी घोषणा केली होती. निवडणुकीत आम्ही महायुतीच्या २३२ जागा निवडून आणल्या. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका, हा इशारा ज्यांना समजायचा आहे ते समजले आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, साधुसंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्यांचे योगदान होते, असे ते म्हणाले.
ईमेलद्वारे मिळालेल्या धमकी संदर्भात विचारले असता उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, धमक्यांना मी कधी घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही. दहावीच्या पेपरसंदर्भात चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. कॅबिनेट बैठकीत कॉपीमुक्त महाराष्ट्राचा संकल्प सरकारने केला आहे. त्यानुसार आजच्या पेपरफुटीतील दोषींवर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
ससूनजवळील मोक्याच्या जागेवरून भाजप-शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता
अंजली दमानिया यांचे पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोट्या आरोपांचे प्रदर्शन – Dhananjay Munde