२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Attack) झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या लष्कर-ए-तैयबाच्या पृष्ठभूमीवरील संघटनेचे तीन दहशतवादी या हल्ल्यात सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, या हल्ल्यानंतर केवळ अनंतनाग व त्रालमध्ये नव्हे, तर जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातही बुलडोझर फिरला आहे. यावेळी लक्ष्य होतं – फारुख अहमदचं घर! लष्कर-ए-तैयबाचा जुना कमांडर, आणि आता पाकिस्तानात लपून बसलेला मास्टरमाइंड. संरक्षण खात्याच्या सूत्रांनुसार, फारुखनेच पहलगाम हल्ल्याच्या कटात महत्त्वाची भूमिका बजावली होती. इतकंच नाही, तर त्याने हल्लेखोरांना सर्वतोपरी मदतही केली.
फारुख अहमद हा १९९० मध्येच पाकिस्तानला (Pahalgam Attack) गेला होता आणि २०१६ पर्यंत भारत-पाकिस्तान दरम्यान फिरत राहिला. ही व्यक्ती केवळ एका हल्ल्यासाठी जबाबदार नाही, तर गेल्या दोन वर्षांतील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याची भूमिका असल्याचं स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानातून भारतात घुसखोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या तीन सेक्टरांची माहिती फारुखकडे असल्यामुळे, तो एक महत्त्वाचा दुवा ठरत आहे.
हल्ल्यानंतर अर्धा डझनहून अधिक व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं असून, हे सर्व जण फारुखचे जवळचे असल्याची माहिती समोर आली आहे. हे चित्र स्पष्टपणे दर्शवते – काश्मीरमधून आणि पाकिस्तानातून चालवलेली दहशतवाद्यांची यंत्रणा अजूनही सक्रिय आहे.
या सगळ्याच्या जोडीला एक अनपेक्षित धागा ओडिशामधून समोर आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) २९ एप्रिल रोजी ओडिशातील कटक येथील एका कुटुंबाची चौकशी केली आहे. या कुटुंबातील रणजीत भोळ आणि शशी नायक हल्ल्याच्या दिवशी पहलगामच्या बैसरण खोऱ्यात उपस्थित होते. यांचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, याचा तपास सुरू आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, भारतीय लष्कराच्या वेबसाईटवर हॅकिंगचा प्रयत्न
पहलगाम हल्ल्यातील सहा कुटुंबांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी