‘या’ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांसह नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे  आवाहन

'या' जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांसह नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे  आवाहन

जळगाव : अरबी समुद्रात लक्षद्वीपमध्ये येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता व बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) क्षेत्रात भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच 2 डिसेंबर 2021 पर्यंत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिक, शेतकऱ्यांनी सतर्क राहात सुरक्षितस्थळी थांबावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व तापी नदीमधील पाण्याच्या पातळीत वाढ होवून हातनूर धरणाच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी व नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.

बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल, तर अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. अवकाळी पावसादरम्यान विजा, गारा व अतिवृष्टीपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. प्रसंगी मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रान्फॉष्र्मर जवळ थांबू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी  राऊत यांनी केले आहे.

Previous Post
RCB

दिग्गज खेळाडूंना डच्चू; रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ‘या’ तीन खेळाडूंना केलं  रिटेन

Next Post
भक्ती, ज्ञान आणि कर्माच्या साहाय्याने चारित्र्यसंपन्न समाज घडवा- भगत सिंह कोश्यारी

भक्ती, ज्ञान आणि कर्माच्या साहाय्याने चारित्र्यसंपन्न समाज घडवा- भगत सिंह कोश्यारी

Related Posts
Goshta Eka Paithanichi

68th National Film Award : मराठीमध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाने मारली बाजी, अजय देवगण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

नवी दिल्ली – 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (68th National Film Award) काल जाहीर करण्यात आले. तानाजी द…
Read More
"नुसतं लोकसंख्या वाढवून उपयोग नाही तर गुणवत्ताही..."; चीनचा भारताला टोला

“नुसतं लोकसंख्या वाढवून उपयोग नाही तर गुणवत्ताही…”; चीनचा भारताला टोला

लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या (Worlds Most Population…
Read More
शरद पवारांना मोठा झटका, 'या' नेत्याने सोडली साथ; अजित पवारांसोबत जाणार!

शरद पवारांना मोठा झटका, ‘या’ नेत्याने सोडली साथ; अजित पवारांसोबत जाणार!

Satish Chavan | शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचा आणखी एक मोठा नेता…
Read More