कोरोना काळात गरीब जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘या’ योजनेला आणखी ४ महिन्यांची मुदतवाढ 

मुंबई – कोविड 19 साथीच्या काळात गरीब जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान कोविड काळातील मोफत अन्नधान्य वितरणात एफसीआय अर्थात भारतीय अन्न महामंडळानं महत्त्वाची भूमिका बजावली असून, अनेक आव्हानांना तोंड देत एफसीआयच्या कर्मचाऱ्यांनी विक्रमी धान्यसाठ्याच्या हाताळणीचं आव्हान यशस्वीरीत्या पेललं, अशी माहिती भारतीय खाद्य महामंडळाच्या पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक आर पी सिंह यांनी काल मुंबईत दिली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय खाद्य महामंडळाच्या पश्चिम विभागाच्या वतीने काल मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या काळात काही कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी देखील गेला. या कर्मचाऱ्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.