‘बाते कम काम जादा’ ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका – नवाब मलिक

‘बाते कम काम जादा’ ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका - नवाब मलिक

पुणे  – महाविकास आघाडी सरकारच्या प्रचार आणि प्रसिद्धीबाबत चर्चा सुरु आहे. मात्र सरकारची ‘बाते कम, काम जादा’ अशी भूमिका असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसरकारच्या कामकाजाचा आढावा माध्यमांसमोर मांडला.

सरकार सत्तेत आल्यावर सर्वप्रथम मागील सरकारच्या काळात प्रलंबित शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर करून राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला. सरकार सत्तेत आल्यानंतर दुर्दैवाने तीन महिन्यातच देशात कोरोनाचे संकट आले. मात्र यात देशभरात जी दुर्दैवी परिस्थिती आपण पाहिली तशी परिस्थिती राज्यसरकारने राज्यात निर्माण होऊ दिली नाही. यासाठी कोविड सेंटर्स, टेस्टींगमध्ये वाढ, ऑक्सिजनसाठा अशा सर्व गोष्टींचा पुरवठा राज्यसरकारने वेळोवेळी केल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

गुजरात राज्यात रुग्णसंख्या लपवण्यात आली. उत्तरप्रदेशमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडे उपलब्ध होत नसल्याने मृतदेह गंगेत सोडण्यात आले, याकडेही नवाब मलिक यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. महाविकास आघाडी सरकारने विकासाची कामे कोविडमध्ये थांबवली, मात्र कोणतेही प्रकल्प रद्द केले नाहीत. शिवाय विविध धोरणांवरही भर देण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

राज्यात कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून कौशल्य विद्यापीठ सुरु करण्यात आले आहे. बेरोजगारी ही मोठी समस्या असल्याने राज्यसरकारने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून बेरोजगारांचा फायदा करुन देण्याचा विचार केला आहे. ही नवीन योजना राज्यात बेरोजगारी संपविण्यासाठी राबविण्यात येईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

राज्यात मविआचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असे भाजपचे नेते सांगत होते. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आता आम्ही राज्यसरकार पाडणार नाही तर हे सरकार पडल्यास आम्ही नवे सरकार देऊ अशी भूमिका मांडत आहेत त्यामुळे मविआ सरकार पडणार नाही हे ते आता स्वीकारत आहेत असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

२०२४ साली हे सरकार पुन्हा राज्यात सत्तेत येईल. मुख्यमंत्री महोदयांना विश्वास आहे की हे सरकार केवळ पाच वर्षांसाठी नाही तर २५ वर्षांसाठी एकत्र आले आहे असे सांगत नवाब मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारमधील एकजुटीची भावना माध्यमांपुढे मांडली.

Previous Post

महापौर पेडणेकरांच्या दालनातून टेंडरच्या फायली गायब, भाजप करणार ACBकडे तक्रार

Next Post
राजेश्वरी खरात

‘फँड्री’तली शालू झळकणार बॉलिवूडपटात; राजेश्वरीला मिळाले बॉलिवूडचे तिकीट

Related Posts

ओडिशा रेल्वे अपघाताला जबाबदार व्यक्तिंना कठोर शिक्षा केली जाईल, पंतप्रधानांची ग्वाही

जखमींच्या उपचारात कोणतीही कसूर केली जाणार नाही. अपघाताची सर्वंकष चौकशी कऱण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
Read More
शरद पवारांबद्दल दादा भुसेंचे आक्षेपार्ह वक्तव्य; राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत आंदोलन...

शरद पवारांबद्दल दादा भुसेंचे आक्षेपार्ह वक्तव्य; राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत आंदोलन…

मुंबई – पन्नास खोके माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके.. दादा भुसे मुर्दाबाद…दादा भुसे (Dada Bhuse) यांचे करायचे…
Read More
वारसाधीश लातूरकर....! लातूर जिल्ह्यात इतिहासाच्या खुणा आजही समृद्ध वारसा घेऊन उभ्या आहेत

वारसाधीश लातूरकर….! लातूर जिल्ह्यात इतिहासाच्या खुणा आजही समृद्ध वारसा घेऊन उभ्या आहेत

लातूर जिल्ह्याला प्रचंड अभिमानाचा वारसा मिळाला आहे. त्या वारसाचे पुरावे ग्रंथात जागोजागी पाहायला मिळतात..  त्यात रत्नापूर महात्म्य’, ‘…
Read More