‘आज संज्याने जी भाषा पत्रकार परिषदेमध्ये वापरली ती महाराष्ट्राच्या कुठल्या संस्कृतीत बसते हे शिवसेनेने सांगावं’

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut Press) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील आणि राज्यातील भाजपवर हल्लाबोल (Raut Criticized BJP) केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरोधातील सर्व प्रकरणे खोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान, राऊत यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट होतील अशी आशा तमाम मराठी जनतेला होती मात्र या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप पाहिल्यानंतर आता भाजप नेते राऊत यांची खिल्ली उडवत टीका करू लागले आहेत. भाजपनेते निलेश राणे यांनी राऊत यांनी वापरलेल्या पत्रकार परिषदेतील भाषेवरून टीका केली आहे.

ते म्हणाले, आज संज्याने जी भाषा पत्रकार परिषदेमध्ये वापरली ती महाराष्ट्राच्या कुठल्या संस्कृतीत बसते हे शिवसेनेने सांगावं. तिथे महिला पत्रकार पण होत्या त्यांच्यासमोर ही भाषा वापरणे कितपत योग्य आहे. त्या पत्रकारांपैकी एका महिलेनेच संजयच्या विरोधात तक्रार करावी नाहीतर हा सुधरणार नाही असं राणे यांनी म्हटलं आहे.