भरधाव वेगातील बस दुभाजकाला धडकल्याने प्रवाशाचा मनकाच तुटला; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

भरधाव वेगातील बस दुभाजकाला धडकल्याने प्रवाशाचा मनकाच तुटला; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे – भरधाव वेगात जाणारी पीएमपी बस जोरात आदळल्याने एका प्रवाशाच्या मणक्यात गॅप पडला. त्यानंतर या प्रवाशांने पोलिसात धाव घेतली आणि चालकाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित चालकावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

अस्लम कादर शेख असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. प्रवाशी राजू मोतीराम चिंचवडकर (वय 62) यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 27 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 27 नोव्हेंबर रोजी लोहगाव ते कात्रज या बसमधून प्रवास करत होते. बस कात्रज येथील सर्पउद्याना समोर आली असताना चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगात बस चालवली.

समोर गतिरोधक असतानासुद्धा ब्रेक न लावल्याने त्यावरून तशीच बस नेल्याने बस जोरात आदळली आणि फिर्यादीच्या मणक्यात गॅप पडला. या घटनेला चालकच जबाबदार असल्याचा तक्रार फिर्यादी यांनी पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post
Scorpio

भाऊ नवी स्कॉर्पिओ आली ना…, ‘या’ महिन्यात होणार लॉंच !

Next Post
ओमिक्रॉनमुळे चिंता वाढत असताना लसींच्या प्रभावाबाबत आली 'ही' माहिती समोर

ओमिक्रॉनमुळे चिंता वाढत असताना लसींच्या प्रभावाबाबत आली ‘ही’ माहिती समोर

Related Posts

“‘महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील मृतांच्या नातेवाईकांना २० लाख तर…”, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई – खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास…
Read More

Navratri Special: नवरात्रीला महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध दुर्गा मंदिरांना द्या भेट

Famous Durga Temples In Maharashtra: देशभरात असंख्य दुर्गा मंदिरे (Durga Temples) आहेत जी दुर्गा देवीच्या भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत.…
Read More
देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात किती मुस्लिम मंत्री? अजित पवारांनी कोणावर व्यक्त केला विश्वास?

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात किती मुस्लिम मंत्री? अजित पवारांनी कोणावर व्यक्त केला विश्वास?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (15 डिसेंबर) मंत्रिमंडळाचा विस्तार (Devendra Fadnavis Government) केला. 39 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ…
Read More