राज्य शासनाने आता आपली वक्र नजर निवृत्ती वेतन धारकांच्या पैशाकडे वळविली – भाजपा

मुंबई – गेल्या सहा महिन्यात निवृत्ती वेतनाची उचल न केलेल्या निवृत्ती वेतन धारकांच्या खात्यात जमा असलेली संपूर्ण रक्कम शासनाकडे जमा करण्याचा आदेश काढून राज्य सरकारने नोकरदारांच्या कष्टाच्या पैशावरही आपला डोळा आहे, हे दाखवून दिले आहे. अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली आहे.

निवृत्तीवेतनधारकांनी संताप व्यक्त केल्यानंतर हे परिपत्रक मागे घेतले गेल्याचे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले असले तरी यातून राज्य सरकारची नियत कळून आल्याचेही भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे.

भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या वित्त विभागाने नागपूर जिल्ह्यातील निवृत्ती वेतन जमा होत असलेल्या सर्व बँकांना पत्र पाठवून सहा महिन्यात निवृत्ती वेतनाची रक्कम न उचललेल्या निवृती वेतन धारकांच्या खात्यात जमा असलेली रक्कम वरिष्ठ कोषागार अधिकार्यांतकडे जमा करावी, असे आदेश दिले आहेत. वाझेंसारख्या अधिकाऱ्याकडून मिळणारी खंडणी कमी पडत असल्याने राज्य शासनाने आपली वक्र नजर निवृत्ती वेतन धारकांच्या पैशाकडे वळविली असल्याचे या पत्रावरून दिसून येते.

सर्व निवृत्ती वेतन धारक आपल्या खात्यातून दरमहा पैसे काढू शकत नाहीत. निवृत्ती वेतन धारकांची तब्येत व अन्य कारणे असल्याने निवृत्त झालेली मंडळी आपल्या सोयीनुसार खात्यातून रक्कम काढत असतात. निवृत्ती वेतन हा राज्य सरकारच्या कर्मचार्यां चा हक्काचा पैसा आहे. तो केव्हा काढावा, त्याचा वापर कसा करावा हा सर्वस्वी त्या कर्मचार्यां चा प्रश्न‍ आहे. राज्य सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. सत्ताधार्यां ना चरण्यासाठी अनेक कुरणे उपलब्ध आहेत. त्यासाठी त्यांनी निवृत्ती वेतन धारकांच्या कष्टाच्या पैशावर डोळा ठेऊ नये, असेही भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

https://youtu.be/iLGbybjU9tc

Previous Post

जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी राजपत्र प्रसिद्ध; तीन जिल्ह्यात होणार भूसंपादन

Next Post

जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढते – मलिक

Related Posts
जयंत पाटील

पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य – जयंत पाटील

मुंबई – महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे अशा…
Read More
Devendra Fadnavis

‘कोरोना काळात भाजपा कार्यकर्त्यांनी सेवेला महत्त्व दिले तसे महत्त्व अन्य कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिले नाही’

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत असलेल्या गरीब कल्याणाच्या योजना पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांवर आधारित आहेत. भारतीय…
Read More
Money

‘या’ व्यवसायात गुंतवणूक केल्याने अल्पावधीत करोडपती व्हाल; अगदी सोप्या मार्गाने कमवा बक्कळ पैसा

पुणे : भारत हा कृषीप्रधान देश (India is an agricultural country) आहे. देशातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर (Agriculture) अवलंबून…
Read More