आर्यन खान पेक्षा एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाने लक्ष द्यावे- समरजितसिंह घाटगे

कागल – आर्यन खानपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे राज्य शासनाने सकारात्मकपणे लक्ष द्यावे व त्यांची दिवाळी गोड करावी. असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले .

येथील एसटी डेपो समोर सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपाच्या ठिकाणी त्यांनी भेट दिली व पाठिंबा व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांची महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करून शासकीय कर्मचाऱ्यांना पर्यंत वेतन द्यावे ही रास्त मागणी आहे. त्यासाठी पाठपुरावा किंवा आवश्यकता भासल्यास मध्यस्थी करण्यास सुद्धा तयार आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी निराश होऊ नये व टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करू नये. असे भावनिक आवाहन त्यांनी केले. यावेळी के.एन कोरे यांनी संपूर्ण आंदोलनाची पार्श्वभूमी विशद केली.