शेअर बाजार घसरला ! ‘या’ कारणांमुळे मोठी घसरण

मुंबई : एबीजी शिपीयार्ड बँक घोटाळ्यामुळे देशात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स १००० अंकानी खाली आला आहे, तर निफ्टी मध्ये देखील मोठा बदल झाला आहे. निफ्टीत ३०८ अंकाची घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

जहाजाची निर्मिती आणि दुरूस्ती करण्याचे काम करणारी एबीजी शिपयार्ड कंपनीने तब्बल २८ बँकांना गंडा घातला आहे. या सर्व बँकामधून सुमारे २२, ८४२ कोटी रूपयाचा घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणी सीबीआयने तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केलाआहे. सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे या घोटाळ्याची चर्चा सध्या जगभरात होत आहे.

एबीजी शिपीयार्ड बँक घोटाळा हा एप्रिल २०१२ जुलै ते जुलै २०१७ या दरम्यान झाला आहे. एबीजी शिपीयार्ड बँक घोटाळ्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियावर टीका केली जात आहे. यावर स्टेट बँक ऑफ इंडियाने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी यासंदर्भात एक निवेदन सादर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. एबीजी शिपीयार्डविरोधात तक्रार दाखल करण्यास विलंब केला नाही, असं स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटलं आहे.