एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला संप सुरूच; आतापर्यंत ९ हजार कर्मचारी निलंबित

ST

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी २९ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवली असून आतापर्यंत ९ हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. गुरुवारी ४९८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

संप मिटत नसल्याने कठोर कारवाईचा बडगा उगारून संपावर गेलेल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबित केले. आतापर्यंत ९ हजार १४१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे तर रोजंदारीवरील ३६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. एकूण १ हजार ९२८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाल्याची माहिती महामंडळाने दिली. ही कारवाईही यापुढे सुरू ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, शासनामध्ये विलगीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या धुळ्यातल्या एस. टी. कर्मचाऱ्यांनी कालपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. सर्व महिला, पुरुष कामगार एकत्रितपणे या आंदोलनात सामील झाले आहेत. तर अकोला जिल्ह्यातल्या एस.टी कर्मचाऱ्यांनी काल भजन गाऊन आंदोलन केलं आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

Total
0
Shares
Previous Post
eknath khadase

नाथाभाऊंच्या मनातून काही भाजप जाईना ?, वाचा नेमकं काय घडलंय…

Next Post
ajit pawar

PDCC Election : 30 वर्षानंतर देखील जिल्हा बँकेसाठी अजित पवारच इच्छुक

Related Posts
corona

वाढत्या रुग्ण्संख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पुन्हा होणार सुरु

मुंबई – काल आढळलेल्या एकंदर कोरोना बाधितांपैकी सर्वाधिक म्हणजे 19 हजार 780 बाधित एकट्या मुंबईतले आहेत. त्याखालोखाल ठाणे…
Read More
congress

‘प्रियंका गांधी यांनी दिलेल्या लडकी हूं, लड सकती हूं या नाऱ्यामुळे महिलांना उर्जा मिळाली’

पुणे : ‘‘लडकी हूं लड सकती हूं’’ या मोहिमेस १२५ दिवस पूर्ण झाल्याबद्दल पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या…
Read More
Pune Crime | पुण्यात CEOP कॉलेजमध्ये विद्यार्थिनींचे चोरून काढले व्हिडीओ, तरुणीच पाठवायची मित्रांना; दोघांना घेतलं ताब्यात

Pune Crime | पुण्यात CEOP कॉलेजमध्ये विद्यार्थिनींचे चोरून काढले व्हिडीओ, तरुणीच पाठवायची मित्रांना; दोघांना घेतलं ताब्यात

Pune Crime | पुण्यातील एका विद्यापीठात विद्यार्थिनींचे खासगी फोटो-व्हिडिओ लीक झाल्याची घटना समोर आली आहे. सीओईपी (कॉलेज ऑफ…
Read More