रशियन धनदांडग्यानवर स्वित्झर्लंड सरकारनं अधिक कडक कारवाई करावी – झेलेन्सकी

कीव – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दीमिर झेलेन्सकी यांनी रशियाबरोबर सविस्तर शांतता चर्चा करण्याची मागणी केली आहे. दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत असताना झेलेन्सकी म्हणाले की युक्रेनची भौगोलिक अखंडता कायम ठेवण्याच्या दृष्टीन आणि एका राष्ट्राला न्याय मिळावा यासाठी चर्चा करण्यास ही योग्य वेळ आहे. रशियानं शांतता चर्चेची तयारी दाखवली नाही तर त्यांच्या पुढील कित्येक पिढ्यांवर या युद्धाचे परिणाम दिसतील असा इशारा झेलेन्सकी यांनी दिला आहे.

दरम्यान, रशियाला या युद्धात मदत करणार्‍या रशियन धनदांडग्यानवर स्वित्झर्लंड सरकारनं अधिक कडक कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. दुसऱ्या बाजूला रशिया युक्रेन युद्धामुळे युरोप मध्ये निर्वासितांच्या प्रश्नानं दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अतिशय गंभीर स्वरूप धारण केलं आहे. संयुक्त राष्ट्रासंघानं जाहीर केलेल्या मानवतावादी दृष्टिकोनाशी सबंधित समन्वयाचा अभ्यास करणाऱ्या एका प्रबंधात या प्रश्नाचा ऊहापोह करण्यात आला आहे.

युक्रेनमधून सुमारे चार कोटी 40 लाख नागरिक बेघर झाले असून अतिशय झटपट ह्या नागरिकांवर हे संकट ओढावलं आहे. सिरीयामधल्या यादवी आणि युद्धानंतर सुमारे एक कोटी 30 लाख नागरिक निर्वासित झाले होते.