तू मला खुश कर, मी तुला पूर्ण मार्क देईन ; नराधम शिक्षकाची विद्यार्थिनीला ऑफर   

नवी दिल्ली-  गुरु-शिष्य या नात्याला पवित्र नाते मानले जाते मात्र या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका शिक्षिकाने इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनीला त्याला खुश  करण्याच्या बदल्यात इंग्रजी विषयात पूर्ण गुण देतो अशी ऑफर दिल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर जर आपले म्हणणे पाळले नाही तर तुला नापास करेन अशी धमकी देखील दिल्याचे समोर आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजस्थानमधील दौसा येथील लालसोटमध्ये एका शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. परीक्षेत चांगले गुण देण्याच्या बहाण्याने शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केले. या नराधम शिक्षकाने सांगितले की, तू मला खुश कर, मी तुला सत्र परीक्षेचे पूर्ण गुण देईन. विद्यार्थिनीने हे ऐकले नाही तर शिक्षकाने तिला नापास करण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ देखील केली.

पीडित मुलीने सांगितले की, ती गावातील एका खासगी शाळेत दहावीत शिकते. याच शाळेत इंग्रजी शिक्षक ओमप्रकाश बैरवा (३०) हा त्याचा मानसिक छळ करत असे. विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, शिक्षकाने  तिला १६ फेब्रुवारी रोजी दुपारी बोलावून घेतले आणि तिचा हात धरून एका रिकाम्या खोलीत नेले. त्यानंतर त्याने अश्लील चाळे केले आणि विरोध करताच धमकी दिली.

दरम्यान, आता या नारधान शिक्षकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सोमवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ओमप्रकाश हा ४ वर्षांपासून एका खासगी शाळेत इंग्रजीचा शिक्षक आहे. घटनेनंतर तो पळून गेला होता, मात्र नंतर पकडला गेला आहे.