ग्रामसभेत होणार आता मतदारयादीचे वाचन

सोलापूर:- मतदारयादीची चाळणी करण्यासाठी 16 नोव्हेंबर 2021 रोजी तालुकानिहाय ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये मयत, स्थलांतरीत, आढळून न येणारे मतदार यांच्या याद्याचे वाचन होणार आहे. तालुका निहाय प्राप्त मयत मतदार याद्याचे वाचन करून मतदारांची नावे वगळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्या अनुषंगाने शंभरकर यांनी बहुउद्देशिय सभागृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, तहसीलदार निवडणूक अमरदिप वाकडे उपस्थित होते.

शंभरकर म्हणाले की, या विशेष मोहिमेमध्ये सर्व मतदार केंद्रावर दिनांक 13 व 14 नोव्हेंबर 2021 तसेच 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी फॉर्म स्वीकारण्यासाठी बीएलओ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांचा शोध घेवून त्यांना मतदार यादीत चिन्हांकित करणे, व्हीआयपी यांची नावे मार्क इलेक्टर म्हणून चिन्हांकित करणे, तृतीयपंथी मतदारांचा शोध घेवून त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे, त्याचबरोबर तालुकास्तरावर नगर परिषद, नगर पालिका व ग्रामीण भागात ग्रामसेवक यांच्या सही शिक्याने मयत मतदारांच्या याद्या झाल्या आहेत. शहरी भागामध्ये महानगरपालिका यांचेकडून मयत मतदारांच्या याद्या प्राप्त करून घेण्यात येत आहेत.

दिनांक 01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाली असून, ज्या नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता त्यांनी संबंधित बीएलओ, तहसिल कार्यालय व उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध असून त्यांनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी . जर त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नसल्यास संबंधित तहसिल कार्यालयामध्ये जावून सदर अर्जाची चौकशी करावी. आपला अर्ज नामंजूर करण्यात आला असेल तर नव्याने नमुना अर्ज क्र 6 भरावा असे, आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

मतदार यादीतील नाव शोधणे व नाव नसलेस www.ceo.maharashtra.gov.in, व www.nvsp.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या करीता जिल्ह्यातील मोठ्या मंदीरामध्ये संस्कार भारतीच्या मदतीने रांगोळी काढण्यात येणार आहे. गॅस सिलेंडरवर क्यूआर कोड देण्यात आला असून मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी यंदाच्या दिपावली उत्सवाच्या निमित्ताने लोकशाही दिपावली स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती शंभरकर यांनी दिली.

https://youtu.be/GmVj7hqrh5o

Previous Post

परमवीर यांंना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव – आशिष शेलार

Next Post

निर्माते ‘दिपक राणे’ यांच्या आगामी ‘पॅन इंडिया सिनेमा’त दिसणार साऊथचे प्रसिद्ध कलाकार !

Related Posts
uddhav thackeray

शिवसेना नव्हे तर ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचे ग्रामपंचायत निवडणूक निकालावर भाष्य

Mumbai – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट…
Read More
Uddhav Thackeray | "उद्धव ठाकरेंना मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनविण्याची अपेक्षा व्यक्त करणे म्हणजे फाजील आत्मविश्वासाचा कळस"

Uddhav Thackeray | “उद्धव ठाकरेंना मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनविण्याची अपेक्षा व्यक्त करणे म्हणजे फाजील आत्मविश्वासाचा कळस”

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अशी अप्रत्यक्ष मागणी ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार…
Read More
प्रेम करावं पण जपुन

‘प्रेम करावं पण जपुन’ या नाटकाचा ५० वा सुवर्ण महोत्सवी प्रयोग जल्लोषात संपन्न

नव्या युगातील प्रेम संबंध समजावून सांगणारं नाटक म्हणजे ‘प्रेम करावं पण जपुन’. मधुसंगिता थिएटर्स आणि अर्चना थिएटर्स निर्मित…
Read More