संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी काही केलेले नाही; जयंत पाटलांचा अजब दावा

सिंधुदुर्ग – मंत्री छगन भुजबळ हे निर्दोष झालेच की आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी काही केलेले नाही… ते निर्दोष होतीलच परंतु माणसाला मानसिक छळ करण्याचे काम…आणि सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र केंद्रसरकारच्या एजन्सीमार्फत काही लोक करत आहे. लवकर सत्तेत येण्याची घाई लागल्याने सगळ्या मार्गाचा अवलंब आणि वापर होतोय असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत केला.

कुठलंही काम हे मेरीटने होणार यामध्ये मराठी आणि अमराठी असल्याचा विषय येत नाही. यापूर्वी ज्या गोष्टी झाल्या त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांना २८ महिने ईडीने तुरुंगात ठेवले ते मराठीच होते ना… मेरीटनेच सगळे होणार आणि आघाडी सरकार कुणावर अन्याय होऊ देणार नाही. आमचं सरकार निष्पक्षपातीपणाने काम करतंय…जी कागदपत्रे पुढे येत आहेत ती धक्कादायक आहे. हे धक्कादायक असल्यानेच एनसीबीने दिल्लीहून चौकशी समितीने त्यांची चौकशी केली. त्यामुळे त्यांचे दाखले हा विषय नसला तरी त्यापेक्षा खंडणीचा जो प्रकार आहे हा अगोदर कधी प्रकार कधी घडला नाही आताच्या राजवटीत मात्र ते सुरु आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

समस्या काय आहे की, मी पक्षाच्या कामाचा आढावा घेतोय…

कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय… त्यांना बुथ कमिट्या करा… यंत्रणा उभ्या करा असे सांगतानाच हे पाहण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ असे सांगत आहेत त्यामुळे लोकं या वाक्याला खूप हसतात… आता तुम्हीही हसलात… हे जे वाक्य आहे त्याला पर्यायी वाक्य शोधतोय परंतु ते मिळत नाही म्हणून ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य वापरत आहे असे सांगताच पुन्हा एकदा पत्रकारांमध्ये हशा पिकला…

जिल्हा परिषदेत आघाडी जर झाली तर आघाडीची चर्चा करण्याअगोदरच स्वबळाची भाषा बोलणं म्हणजे थोडंसं आघाडी करायचीच नाही अशा भावनेतून बोलण्यासारखं होतं तशी आमची भावना नाही.

आघाडीला आमचं प्राधान्य आहे. स्वबळाचा नारा आज द्यायची गरज नाही. सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सामंजस्याने, चांगल्या पद्धतीने या जिल्हा परिषदेत काम करतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.